मुक्तपीठ टीम
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरातील गावकऱ्यांनी दूषित पाणी प्यायल्याने अनेकांना अतिसाराची लागण झाली आहे. या साथीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व बाधितांवर उपचार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. युद्धपातळीवर मेळघातातील सर्व गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी शासनामार्फत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.’
मनोज चव्हाण यांचं पत्र जसं आहे तसं…
प्रती,
सन्मा. नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !
विषय: मेळघाटातील गावांना मिळणाऱ्या दूषित पाणी पुरवठा संदर्भात…..
महोदय, सर्व प्रथम आपणांस नव्याने सरकार स्थापनेच्या आणि आगामी होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.
” संघर्ष निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो, तोच पुढे जातो.”
“हर एक बदलाव बड़ी कामयाबी हा हिस्सा होता है”।
“आयुष्यात अशी भरारी घ्यावी की प्रत्येकास आपला अभिमान वाटला पाहिजे.”
याचसाठी मनापासून नव्या राजकीय पटलावरील मुख्यमंत्री पदाच्या यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि अंतकरण पुर्वक अभिनंदन.
उपरोक्त विषयांस अनुसरुन आम्ही आपणांस या पत्राद्वारे विनंती करीत आहोत की, सध्यस्थितीत मेळघाटातील गावकऱ्यांना दुषित पाणी मिळत आहे. हि अत्यंत गंभीर समस्या असून त्याचे परिणाम देखील मेळघाटातील बहुतांशी गावातील गावकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अनेक वाड्यांमध्ये दुषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे अलिकडेच २ मृत्युची व ३२ जण अत्यावश्यक स्थितीत असल्याची नोंद देखील झालेली आहे. तसेच गावांमध्ये दुषित पाणी पिण्यामुळे भयानक रोगांना सामोरे जावे लागले आहे. आपण या मेळघाटातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेवून युद्धपातळीवर मेळघातातील सर्व गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी शासनामार्फत सहकार्य करावे, हि विनंती.
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत!
धन्यवाद!
आपला नम्र,
डॉ . मनोज चव्हाण
सरचिटणीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना