Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात ओबीसी फक्त ४० टक्के! बांठिया आयोगाच्या अहवालामुळे नवा वाद!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Banthia commmsision says maharashtra has 40 percent of obc

मुक्तपीठ टीम

ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के असल्याचं आजवर मानलं जात असताना प्रत्यक्षात ही संख्या चाळीस टक्क्यांच्याच आसपास असल्याचं निरीक्षण बांठिया आयोगाच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. त्यानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण असावं, अशी शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे. बांठिया आयोगाकडून नोंदवण्यात आलेल्या या निरीक्षणामुळे ओबीसींचे भविष्यात आरक्षणविषयक आणखी नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे आता नवा वाद भडकण्याची शक्यता आहे.

ओबीसी समाज राजकीयदृष्ट्या मागास!

  • राज्यात १९९४ नंतर ओबीसींना आरक्षण लागू झाले.
  • यानंतर एकही ओबीसी मुख्यमंत्री झाला नसल्याने हा समाज राजकीयदृष्टय़ा मागास असून, त्यांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे विवेचन करीत बांठिया आयोगाने राजकीय आरक्षणाचे समर्थन केले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के मर्यादेच्या आत राहून अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण दिल्यावर ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण द्यावे आणि जिथे अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे, तिथे ओबीसींना आरक्षण देऊ नये, अशी शिफारस आयोगाने केली आहे.
  • बांठिया अहवालाच्या आधारेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे भवितव्य मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ठरणार आहे.
  • ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावे किंवा नाही, याबाबतचा निर्णय न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ घेणार आहे.

तपशील तयार करण्यासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती!!

  • मंडल आयोग आणि त्यानंतरच्या काळातील सर्वेक्षणानुसार ओबीसींची लोकसंख्या ५२ ते ५४ टक्के असल्याचे मानले जात होते.
  • मात्र, आता ही लोकसंख्या ४० टक्क्यांपर्यंत असल्याचा निष्कर्ष बंठिया आयोगाने काढल्याने त्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
  • स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाबाबत इंपिरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने हा तपशील तयार करण्यासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती केली होती.
  • बंठिया आयोगाने काही महिन्यांमध्ये वेगवेगळी सर्वेक्षणे, आकडेवारीचा अभ्यास केला.
  • राज्य सरकारच्या यंत्रणेने मतदारयादीतील आडनावांवरुन ओबीसींच्या लोकसंख्येची गणना केली.
  • त्यानंतर बांठिया आयोगाने ७८१ पानांचा अहवाल राज्य सरकारला शुक्रवारी सादर केला.
  • राज्य सरकारने तो न्यायालयात सादर केला आहे.

Tags: Banthia CommissionMaharashtraOBCOBC reservationओबीसीबांठिया आयोगमहाराष्ट्र
Previous Post

‘वॉटर मॅन’ मनोज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: मेळघाटात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सहकार्याची विनंती!

Next Post

‘महा’विक्रमाचा गौरव! सिंगल कॉलम पिअर, पूल डबल डेकर

Next Post
‘महा’विक्रमाचा गौरव! सिंगल कॉलम पिअर, पूल डबल डेकर

'महा'विक्रमाचा गौरव! सिंगल कॉलम पिअर, पूल डबल डेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!