Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना विधवांसाठीचं ‘मिशन वात्सल्य’ अपयशी, चांगलं काम करत असल्याचा महिला बालविकास मंत्र्यांचा दावा चुकीचा!

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mission vatsalya for corona widows is unsuccessful alleged activists

मुक्तपीठ टीम

कोरोनात विधवा झालेल्या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मिशन वात्सल्य योजना सुरू केली.२७ ऑगस्टला सुरू झालेल्या या योजनेला २७ मार्च रोजी ७ महिने पूर्ण होत आहेत. परंतु या ७ महिन्यात ही योजना अपयशी ठरली आहे, असा आरोप कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने केला आहे. असे असूनसुद्धा हे अभियान अतिशय चांगले काम करत असल्याची मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळात दिलेली माहिती दिशाभूल करणारी व चुकीची व संतापजनक आहे, असे मत एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक हेरंब कुलकर्णी यांनी मांडलं आहे.

मिशन वात्सल्याचे अध्यक्ष प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आहेत व प्रत्येक आठवड्याला १ याप्रमाणे महिन्याला ४ बैठक होणे अपेक्षित आहे पण ६ महिन्यात २८ बैठका सोडाच ५ बैठकाही न झालेले अनेक तालुके आहेत.

याबाबत अनेकदा यशोमती ठाकूर यांना आंदोलनाच्या समितीने पत्र पाठवले जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .तरीही काहीही फरक पडला नाही. तहसीलदार बैठका घेत नाही व महिला बालकल्याण अधिकारी पाठपुरावा करत नाही असेच महाराष्ट्रातील सर्वसाधारण चित्र आहे मात्र बैठका झाल्याचे खोटी माहिती तालुका स्तरावरील अधिकारी प्रशासनाला देत आहेत व मंत्री तेच विधीमंडळात सांगत आहेत.

एकल महिला पुनर्वसन समितीने वेगवेगळ्या तालुक्यात किती बैठका झाल्या ही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अतिशय निराशाजनक चित्र असल्याचे आढळले. अनेक ठिकाणी स्थापनेच्या बैठका झाल्या नंतर समितीच्या जिथे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तिथे काही बैठका घेण्यात आल्या .समितीचे कार्यकर्ते जिथे सक्रिय नाहीत तिथे तर अधिक निराशाजनक स्थिती आहे कारण विचारणारे कोणीच नाही.

या शासकीय समितीने प्रत्येक गावात पथके स्थापन करुन महिलांची कागदपत्रे गोळा करावीत व त्यांना २५ प्रकारची कागदपत्रे व योजना मिळवून द्याव्यात अशी आदर्श अपेक्षा शासन आदेशात आहे परंतु समितीच्या बैठकाच होत नाही तर पथके स्थापन होणे दूरच राहीले..

ही समिती मालमत्ताविषयक अधिकारावर ही काम करते आहे असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळात सांगितले.अशी किती प्रकरणे निकालात निघाली हे मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीरपणे सांगावे म्हणजे ही समिती किती प्रभावीपणे काम करते आहे हे महाराष्ट्राला कळेल ..

कोरोना विधवांच्या प्रश्नाकडे शासन किती असंवेदनशील रीतीने बघत आहे याचाच हा पुरावा आहे. वास्तविक मंत्री यशोमती ठाकूर यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यांनी याचा राज्य स्तरावरून सातत्याने आढावा घ्यावा अशी विनंती अनेकदा करण्यात आली परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नाही..परिणामी कोरोना विधवांसाठी शासनाने निर्माण केलेली ही समिती आज पूर्णतः अपयशी ठरली असून कोरोना विधवांचे प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित झाले आहेत

अजूनही आयुक्त पातळीवरून या समिती सक्रिय करण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे अशी भावना कोरोना समितीने मांडली आहे..


Tags: coronaHeramb Kulkarniwidow womanYashomati Thakurकोरोनामिशन वात्सल्ययशोमती ठाकूरविधवाहेरंब कुलकर्णी
Previous Post

प्रियांका चोप्राचा ब्लॅक बोल्ड लूक झाला चर्चेचा विषय…नेकलेस किंमत ऐकून व्हाल थक्क!

Next Post

खाकी, डी कंपनी आणि बारामती! सेटलमेंट घडवणारा मुंबईतील ‘तो’ नेता कोण?

Next Post
Devendra Fadanvis (3)

खाकी, डी कंपनी आणि बारामती! सेटलमेंट घडवणारा मुंबईतील ‘तो’ नेता कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!