मुक्तपीठ टीम
यंदाचा मिस इंडिया २०२२चा किताब सिनी शेट्टीने पटकावला आहे. ३ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया २०२२चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये एका नेत्रदीपक स्पर्धेनंतर सिनी शेट्टीला मिस इंडियाचा क्राउन देण्यात आला. यावेळी मिस इंडियाच्या या स्पर्धेत ३१ सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया स्पर्धा जिंकली.
शेट्टी मिस इंडिया २०२२ची विजेती ठरलेली सिनी शेट्टी २१ वर्षांची आहे. सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला, पण ती मूळची कर्नाटक राज्यातील आहे. त्यांनी अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय ती चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट करत आहे.
सिनी शेट्टी ही एक भरतनाट्यम डान्सर आहे
- मिस इंडियाचा क्राउन जिंकलेली सिनी शेट्टी केवळ अभ्यासातच चांगली हुशार नाही तर ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे.
- तिने वयाच्या ४थ्या वर्षापासून नृत्य करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या १४व्या वर्षी तिने स्टेजवर सादरीकरण केले.
- मिस इंडिया २०२२च्या विजेतेपदापूर्वी तिने उप-स्पर्धांमध्ये मिस टॅलेंट पुरस्कार जिंकला आहे.
मिस इंडिया २०२२चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टींने पटकावले. राजस्थानच्या रुबल शेखावतला फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले. तर उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान मिस इंडिया २०२२ ची सेकंड रनर अप होती.