मुक्तपीठ टीम
खासदार ओवैसींना भाजपाप्रमाणेच शिवसेनाही दुष्मन मानते. मात्र, ओवैसींच्या एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलिल यांनी थेट काँग्रेस – राष्ट्रवादीला भाजपाविरोधात युतीची ऑफर दिली आहे. शिवसेना धुडकावत असूनही त्यांना शिवसेनेचेही वावडे नाही, असेही ते ठासून सांगत आहेत. त्यामुळे एमआयएम खरोखरच भाजपाविरोधात नेम धरत ही ऑफर देत आहे की भाजपाची बी टीम अशी टीका होणाऱ्या एमआयएमचा प्रयत्न शिवसेनेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
एमआयएमच्या इम्तियाझ जलिल यांची काय ऑफर?
- भाजपाविरोधात आम्ही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहोत.
- भाजपाचा पराभव आवश्यक आहे.
- त्यासाठी शिवसेनेचेही आम्हाला वावडं नाही.
- सध्या या तीन पक्षांची रिक्षा आहे, तिला आमचं चौथं कार लागलं तर कारमध्ये आरामात प्रवास आहे.
शिवसेना काय म्हणते?
- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एमआयएमशी उघड किंवा छुपी युती होण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत ऑफर धुडकावून लावली आहे.
- शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मात्र एमआयएमची ऑफर धुडकावून लावले आहे.
- आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानतो.
- एमआयएम औरंगजेबाला मानतात, त्यांच्यासोबत जाणेच शक्य नाही.
- हैद्राबादमधील रझाकारांची देशाला लुटणारी विचारधाराच एमआयएम पुढे चालवते.
संभ्रमासाठी एमआयएमचा प्रयत्न? सूत्रधार कोण?
- एमआयएम भाजपाविरोधात भूमिका घेण्याचा आव आणत असली तरी प्रत्यक्षात ती भाजपालाच फायदा होण्यासाठी प्रयत्न करते असा, आरोप भाजपाविरोधी नेत्यांकडून होत असतो.
- उत्तर प्रदेशातील एमआयएमच्या सहभागामुळे अनेक मतदारसंघात भाजपाचा निसटता पराभव झाला आणि त्याचा फटका समाजवादी पार्टीला बसला, असे दिसते.
- त्यामुळे आताही एकीकडे भाजपा नेते शिवसेनेच्या हिंदुत्वाला संशयाच्या भोवऱ्यात आणणारी विधानं करत असताना एमआयएम सारख्या कडवट मुस्लिमवादी पक्षाने थेट शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीशी युतीची ऑफर देणे हे संशयास्पद मानले जात आहे.