Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार नामधारी, राज्यपालच खरे अधिकारी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
delhi aap

मुक्तपीठ टीम

दिल्ली सरकार म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे सरकार ही परिस्थिती आता इतिहासजमा झाली. आता दिल्ली सरकार म्हणजे नायब राज्यपाल सरकार असणार आहे. या कायद्यानुसार दिल्लीत आता जनतेने निवडून दिलेल्या सरकारपेक्षा जास्त अधिकार नायब राज्यपालांना मिळणार आहेत. यावर आम आदमी पक्षाने विरोध करत, हा दिवस लोकशाहीसाठी काळा दु:खाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने दिल्लीत नवीन कायदा लागू केला आहे. गृह मंत्रालयाने दिल्लीत गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २०२१ (GNCT Act) लागू झाला असून आता दिल्लीतील खरे सरकार हे नायब राज्यपालच असतील हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक काढून २७ एप्रिलपासून हा कायदा लागू झाल्याचं सांगितलं आहे.

निवडून आलेल्या सरकारला नामधारी बनवणारा कायदा

  • हा कायदा लागू झाल्यानंतर आता दिल्लीत सरकारचा खरा अर्थ नायब राज्यपाल असे झाले आहे.
  • दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या तुलनेत नायबस राज्यपाल अनिल बैजल यांना जास्त अधिकार राहणार आहेत.
  • कुठलाही निर्णय घेण्यासाठी दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • सरकारला वैधानिक निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी ७ दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची मंजुरी घेणे आता आवश्यक राहील.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस असल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल. तसेच लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर बंधने घालण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.आम्ही सत्तेची चावी सामान्य जनतेच्या हातात देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू. कितीही अडथळे आणले तरीही आम्ही आमचे चांगले कार्य सुरूच ठेवणार आहोत, त्यात कधीच खंड पडणार नाही.

राज्यसभेने २४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त कायदे मंजूर केले. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या कायद्यात सरकार म्हणजे दिल्लीचे उपराज्यपाल. हे नमूद करते की हा कायदा विधिमंडळ आणि कार्यकारिणी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल. निवडून आलेले सरकार आणि राज्यपाल यांच्या जबाबदाऱ्यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजेच एनसीआर दिल्लीच्या शासनाची संवैधानिक योजनेनुसार परिभाषित केले जाईल.

यापूर्वीही ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली होती

  • दिल्ली सरकार आणि उप राज्यपाल यांच्या अधिकारासंबंधित लढाई यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.
  • तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, सरकार जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजे आणि निवडून आलेले सरकार हेच सर्वोच्च आहे.
  • तत्कालीन सीजेआय दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने अधिकारांचे समन्वय असले पाहिजे, असे म्हटले होते.
  • दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळणे शक्य नाही, असे खंडपीठाने म्हटले होते.
  • दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असून राज्य सरकारला विशेष अधिकार देता येणार नाहीत.
  • न्यायालयाच्या म्हणण्यानुसार उपराज्यापाल हे दिल्लीचे प्रशासक आहेत.
  • कायदा बनवण्यापूर्वी आणि नंतर तो उपराज्यापाल यांना दाखवावा लागतो.
  • कॅबिनेट – उपराज्यापालमध्ये मतभेद असल्यास, हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठवावे.
  • केंद्र आणि राज्य संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजेत.

Tags: aam aadmi partyarvind kejriwaldelhiGNCT Actअरविंद केजरीवालआम आदमी पक्षकेंद्र सरकारदिल्ली सरकारनायब राज्यपाल सरकार
Previous Post

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत” – पृथ्वीराज चव्हाण

Next Post

कोरोना उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्याला नीलम गोऱ्हेंकडून ६५लाखाचा निधी

Next Post
neelam Gorhe

कोरोना उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्याला नीलम गोऱ्हेंकडून ६५लाखाचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!