मुक्तपीठ टीम
फेसबुक मेटाव्हर्स भारताला मोठे आर्थिक लाभ देऊ शकतात. सोशल मीडिया कंपनीचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष निक क्लेग यांनी म्हटले आहे की, “मेटाव्हर्स भारताला मोठा आर्थिक लाभ देऊ शकते. त्यासाठी देशातील विकासक क्रिएटिव्ह कम्यूनिटी कौशल्ये आणि प्रतिभेची आवश्यकता आहे.”
एफआयसीसीआयच्या ‘एक्सआर ओपन सोर्स फेलोशिप प्रोग्राम’ला संबोधित करताना क्लेग म्हणाले की, “अभियांत्रिकीसाठी या क्षेत्रात प्रचंड रुची आणि प्रतिभेसह, नवीन ज्ञानाचा उपयोग करण्याची उद्योजकता भारतात झपाट्याने वाढत आहे. यामुळेच, तंत्रज्ञानासह नावीन्यपूर्ण क्षेत्रात भारत आघाडीवर आहे.
क्लेग म्हणाले, एक्सआर ओपन सोर्स सारख्या कार्यक्रमांद्वारे या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या भारतीय विकासकांना समर्थन देऊ. त्यांची प्रतिभा, दृष्टी आणि प्रयत्न पाहता आशा आहे की इंटरनेट तंत्रज्ञानाची पुढील पिढी सहयोगी आणि प्रवेशयोग्य अशा प्रकारे तयार केली जाईल. येत्या काही पिढ्यांमध्ये, संपूर्णपणे नवीन संगणकीय व्यासपीठ मेटाव्हर्स तयार करण्यात भारत एक प्रमुख बनेल. यामुळेच एक कंपनी म्हणून आम्ही आमच्या अॅप्स आणि सेवांची देशातील लाखो लोकांपर्यंत उपलब्धता सुनिश्चित केली, परंतु नवनवीन शोधांची ओळख सर्वप्रथम भारतात करून देण्याचा संकल्प केला.