मुक्तपीठ टीम
येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक होणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर स. १०.५५ ते दु. ३.५५ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
सीएसएमटीहून स. १०.४८ ते दु. ३.३६ या वेळेत सुटणा-या धीम्या गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवणार. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला येथे थांबतील. पुढे धीम्या मार्गावर वळवणार. स. स. १०.४० ते दु. ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणा-या अप धिम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीपर्यंत अप जलद मार्गावर वळवणार. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर स. ११.४० ते दु. ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत. वाशी/बेलापूर/पनवेल मार्गे सीएसएमटी/ वडाळा रोडवरून स. ११.१६ ते दु. ४.४७ पर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटी स. १०.४८ ते दु. ४.४३ पर्यंत सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.
- सीएसएमटीसाठी स. ९.५३ ते दु. ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून स. १०.४५ ते सा. ५.१३ पर्यंत सीएसएमटीकडे येणा-या अप हार्बरची सेवा बंद राहतील.
- तथापी, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी फलाट क्र.८ वरुन विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत स. १० ते सायं. ६ पर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा.