Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महानगरपालिका व नगरपालिकामधील सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे

लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करणार

February 24, 2022
in सरकारी बातम्या
0
Meeting to amend the ruling of Lad-Paage Committee

मुक्तपीठ टीम

सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत शासनाच्या  विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

 

मंत्रालयातील दालनात लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, दूरदृश्यप्रणालीव्दारे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सफाई कामगार नेते गोविंदभाई परमार, सुभाष मालपानी, शकील मुजावर यावेळी उपस्थित होते.

 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या २०१६ रोजीच्या शासननिर्णयानुसार फक्त वाल्मिकी मेहेतर व इतर अनुसूचितजाती मधील सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू होता. इतर सर्व जातीच्या सफाई कर्मचारी यांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये बदल करून सर्वच जातीच्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू  करणे, यासह सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या  व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोग यांनी केलेल्या शिफारशींचाही विचार करण्यात येईल.

 

सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करून लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर करण्यात येईल यामुळे राज्यातील सर्व महानगर पालिका व नगरपालिकामधील वारसा हक्काचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

धारावी येथे भीम थीम पार्कसह सभागृह बांधकामाच्या प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही

धारावी येथे संत रोहिदास सभागृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच धारावी येथे भीम थीम पार्क उभारणे हे तीन प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्यात यावेत, लवकरात लवकर या प्रस्तावांवर  कार्यवाही  करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सांगितले.                                                   

 

दिव्यांगांचे राज्य स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

मागील काही वर्षांपासून राज्य स्तरावर दिव्यांग अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार या वर्षी दिले जावेत यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मागील पाच वर्षातील प्रलंबित पुरस्कार प्रदान करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


Tags: Dhananjay MundeLaad-Paage Committeeधनंजय मुंडेलाड-पागे समिती
Previous Post

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता सवय बनणे आवश्यक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Next Post

अखेर युद्ध! रशियाकडून युक्रेनवर हल्ले, जगभरात शेअर बाजार गडगडले! तेल भडकले!!

Next Post
russia ukrain war And Putin

अखेर युद्ध! रशियाकडून युक्रेनवर हल्ले, जगभरात शेअर बाजार गडगडले! तेल भडकले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!