मुक्तपीठ टीम
केंद्रीय कर्मचार्यांसाठी एक मोठी बातमी पुढे आली आहे. केंद्रीय कर्मचार्यांची संघटना जेसीएम नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरीची कार्मिक-प्रशिक्षण विभाग आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमेत २६ जून रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता म्हणजे डिएमध्ये वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेता येणार आहे. त्यामुळे ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६० लाख केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
३ हप्तामध्ये मिळणार डिए
- कोरोनामुळे, कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा १ जानेवारी २०२०, १ जुलै, २०२० आणि १ जानेवारी २०२१ डीए म्हणजेच महागाई भत्ता गोठविला आहे.
- तीनही हप्ते मिळाल्यानंतर एकूण डीए २८ टक्क्यांपर्यंत वाढेल ज्यामध्ये १ जानेवारी २०२० पासून ४ टक्क्यांची वाढ, १ जुलै २०२० पासून ४ टक्के आणि १ जानेवारी २०२१ पासून ४ टक्के वाढीचा समावेश आहे.
- याचा ५० लाखाहून अधिक कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.
तुम्हाला किती डीए मिळणार?
- केंद्रीय कर्मचार्यांना सध्या १७% डीए मिळतो.
- गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ जाहीर केली होती पण कोरोनामुळे ते पुढे ढकलले.
- कोरोनामुळे, अर्थ मंत्रालयाने जून २०२१ पर्यंत ५० लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६१ लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) मध्ये वाढ करण्याचे मान्य केले होते.