Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) च्या ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्घाटन

December 16, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Hon DCM launching MEDA single window web portal for renewable energy projects

मुक्तपीठ टीम

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)च्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अन्बलगन, संचालक विश्वास पाठक  संचालक योगेश गडकरी, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारे , महाव्यवस्थापक (प्रशासन) सौ रेश्मा माळी, महाव्यवस्थापक प्रकल्प आनंद रायदुर्ग , महाव्यवस्थापक (पवन ऊर्जा ( मनोज पिसे , महाव्यवस्थापक (सौर), विनोद शिरसाठ , महाव्यवस्थापक (ऊर्जा संवर्धन)  तगडपल्लीवर, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी उपस्थित होते..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूकही होत आहे. गुंतवणूकदार व विकासकांना उद्योग उभारण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग’ अत्यंत महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने ‘महाऊर्जा’ने विकसित केलेले सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदार व विकासकांसाठी

खूप उपयोगी ठरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि वापराला अधिक चालना देणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूकदार व विकासकांना साह्यभूत ठरेल असे सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप म्हणाले, एक खिड़की ऑनलाईन वेब पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी महावितरण, महापारेषण, राज्यभार प्रेषण केंद्र व मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून, त्याअनुषंगाने विविध टप्प्यांवर परवानगीसाठी लागणारा वेळ हा कमीत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प विकासक, प्रकल्प गुंतवणूकदार यांना मंजुरीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणांतर्गत नवीन गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे.

महाऊर्जाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग यांनी एक खिडकी वेब पोर्टल विकसित करणेसाठी कार्यरत असणाऱ्या संबंधित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.

अक्षय ऊर्जा प्रकल्प सिंगल विंडो पोर्टल

अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी सध्याच्या परिस्थितीत विकसक/गुंतवणूकदार/बिड विजेत्याला विविध  विभागांकडून परवानग्या, मंजूरी, संमती इ. मिळवणे आवश्यक आहे.  ही मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वेळ कमी करण्यासाठी सिंगल विंडो वेब पोर्टलचा विकास, व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी करण्यात येत आहे.

आता या सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि विविध विभागांच्या मंजुरी/परवानग्यांची संपूर्ण प्रक्रिया उदा.  (MEDA, MSEDCL, MSETCL, चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, SLDC इ.) सर्व पेमेंट्ससह केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारे केले जातील.

संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी वेळ कमी केली आहे.

या सिंगल विंडो पोर्टलच्या अंमलबजावणी प्रक्रियेतील कोणतीही शंका संबंधित विभागांद्वारे नियुक्त केलेल्या तक्रार अधिकारी MEDA आणि नोडल अधिकाऱ्याद्वारे वेळेत सोडवली जाईल.

हे सिंगल विंडो पोर्टल संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करेल, भागधारकांना त्यांच्या मंजुरी प्रक्रियेतील वेळ कमी करेल आणि  महाराष्ट्र राज्यातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देईल.


Tags: MEDAOnline Window Single Portalउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण
Previous Post

करोनाकाळात १५% शुल्क कपातीच्या निर्णयाची शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी नाही! पालकांच्या पदरी निराशा!!

Next Post

विनियोजन विधेयकांच्या कार्यवाही संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Next Post
Hon’ble Cm Sir meeting regarding Costal Road Meeting 1

विनियोजन विधेयकांच्या कार्यवाही संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!