Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘पॉर्न’अलर्ट: पॉर्न पाहता? नक्कीच वाचा ‘हे’ही!

April 24, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Mayur Joshi Article on Porn

मयूर जोशी

आज एक पॉर्न वर असलेली पोस्ट वाचली. केवळ पॉर्न बघितल्यामुळे बलात्कार करण्याची इच्छा कशी होत असेल याबाबत.

 

मी देखील पॉर्न बघितलेले आहेत एकेकाळी. परंतु त्यानंतर ते बंद केले. कारण मला माझा स्वतःचा रस्ता बदलायचा होता म्हणून. परंतु नंतर काही गोष्टी समोर आल्या त्या मांडायचा प्रयत्न करतो. त्याआधी एक स्वतःचा अनुभव सांगतो.

 

कॉलेजला असताना मी बुधवार पेठेमधील वेश्या वस्तीमध्ये तेथील वेश्यांच्या मुलांना शिकवण्या करता जायचो. दर शनिवारी. साधारण काही महिने गेलो असेल. त्यामध्ये तेथील एका मुलाच्या आईची ओळख झाली होती. तीस-पस्तीस वर्षाची असेल तेव्हा ती.

 

या व्यवसायात कशी आली हे मी तिला एकदा विचारले होते, तिच्याकडे चहा पिताना. तिने मला सांगितले ती मूळची बंगालची. लहानपणी आई-वडील वारले. ती तिच्या काकाकडे राहायला होती. तेरा-चौदा वर्षाची असताना काकाने तिला विकले कलकत्त्यामध्ये. तिकडून तिला पुण्याला आणले गेले. ती धंदा करण्यास तयार नव्हती, त्यामुळे तिला काही दिवस उपाशी ठेवले. तरी देखील ती ऐकायला तयार नाही मग याच धंद्यामधील जे दलाल असतात त्यांनी किंवा त्यांच्या माणसांनी तिच्यावर बलात्कार केले. आता जी गोष्ट वाचवायची होती तीच संपल्यामुळे त्यानंतर तिनेदेखील पोटापाण्यासाठी धंदा चालू केला.

 

तिला मी सहज विचारले की यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली तर तुम्ही जाल का?

ती म्हणाली आता ते शक्य नाही आणि माझी इच्छा देखील नाही. आता मला कोण काम देणार आणि दुसरी गोष्ट इतकी वर्ष दारू सिगरेट याची सवय झालेली आहे. त्याकरता आता मला वेगळा खर्च करावा लागत नाही तर गिऱ्हाईक सगळं काही देतो. खाण्या पिण्याचा प्रश्न मिटलेला आहे. मेकअप आणि नट्टापट्टा याचे साहित्य मिळते. अजून काय पाहिजे आहे आयुष्यामध्ये? त्यामुळे मला कोणीही सांगितले तरी मी अजून बाहेर येणार नाही. खूप मोठी स्टोरी आहे ती थोडक्यात सांगितले.

 

त्यादिवशी घरी येऊन मी बेक्कार रडलो होतो.

आता आपण पॉर्न म्हणजे काय बघू या. आपल्याला वाटते की आपल्या समोर हिरो आणि हीरोइन पैसे घेऊन स्वेच्छेने पॉर्न मूव्ही तयार करतात आणि बनवतात. परंतु ते असे नाही. बऱ्याच पोर्न तारिका ज्यांनी ही इंडस्ट्री सोडली त्यांचे इंटरव्यू आहेत यु ट्यूबवर ते कधी बघावे.

 

हो, बरेच लोक पैशासाठी आणि स्वतःचे शरीर दाखवण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये येतात. परंतु त्यांची संख्या नगण्य. ह्यूमन ट्रॅफिकिंग हा प्रकार यामागे किती मोठा आहे. आपल्याला जे दिसते ते फक्त हिमनगाचे वरचे टोक. या धंद्या मधील जवळपास सर्वजण हे ड्रग ॲडिक्ट आहेत. पैशासाठी दिवसातून जास्तीत-जास्त शूट करणाऱ्या मुली कोकेन आणि हिरोइन या सगळ्याच्या आहारी गेलेल्या. त्यामध्ये देखील नॉर्मल सेक्स न दाखवता काहीतरी भयानक आणि अवास्तव सेक्समधील गोष्टी दाखवणाऱ्यांना त्या कलाकारांना तर ड्रग्स घेण्याशिवाय काम करता येतच नाही. कारण इतका त्रास शरीराला सहन करणे हे आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यामुळे नशे मध्‍ये ते काम करणे त्यांना सोपे जाते.

 

याकरता स्वतःच्या इच्छेने येणारी माणसे खूप कमी आणि ब्लॅकमेलिंग, वुमन ट्रॅफिकिंग, बलात्कार यांच्यामुळे आणलेली माणसे ही प्रचंड आहेत. त्यामुळे पोर्न बघणारा प्रत्येक माणूस या गोष्टींना सपोर्ट करत असतो आणि थोडक्यात त्यांचे व्ह्यूज वाढवून त्या इंडस्ट्रीला पैसा देत असतो. म्हणजेच प्रत्येक पॉर्न बघणारा माणूस हा या सगळ्या गैरप्रकारांना एका प्रकारे पैसा देत असतो. त्यामुळे अनेकांच्या महिलांचे सबलीकरण वगैरे वगैरे या सगळ्या फक्त वरवरच्या थापा असतात.

 

आपल्या आई बहिणीवर जबरदस्ती करून किंवा त्यांना पळवून नेऊन त्यांना सारखा ड्रग ॲडिक्ट केले आणि नंतर त्यांच्याकडून पॉर्न करून घेतला तर कसे वाटेल? हा विचारदेखील पॉर्न बघणाऱ्याच्या मनात येत नाही.

 

आता दुसरी बाजू मांडतो ती मानसिक अवस्थेची.

आपण जे काही करतो त्याची सवय आपल्या मनाला लागत असते. आपण पंधरा वीस मिनिटे ध्यानधारणा केली की हळूहळू चित्त शांत होत जाते. पॉर्न बघितल्यामुळे त्या वेळेपुरता भावनांचा निचरा होत असेल असे म्हणणारे लोक अक्षरशा डोक्याने मूर्ख आहेत. एक तर त्या गोष्टी बघितल्या अशा गोष्टी अंतर मनामध्ये कुठे ना कुठे तरी रूजत असतात. याचा त्यांना अंदाज येत नाही. मग शुद्धी मध्ये असताना कदाचित त्यांच्या मनावर त्यांचा ताबा असतो परंतु एकदा दारू प्यायला किंवा कोणत्याही नशेच्या अधीन गेले की मग मात्र अंतर्मन आणि त्याच्या भावनांवर कंट्रोल राहत नाही.

 

त्यामध्ये पॉर्नदेखील सगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत. साधा सेक्स असलेला , जबरदस्तीने केलेल्या गोष्टी. अत्यंत विकृत. या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी दबून बसलेले असतात त्या अचानक जागे होतात आणि मग अत्यंत घाणेरडे कृत्या घडून जाते. आणि ते पॉर्नमुळे असते.

 

अजून एक बाजू म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये खरोखर सेक्स वगैरे केलेला नसतो त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या अशा अपेक्षा तयार होतात. मुळातच पॉर्नमध्ये जितका वेळ सेक्स चालतो इतका वेळ प्रत्यक्षात फार कमी वेळा चालत असेल. हे कोणाला माहीतच नसते आणि मग होतात ते अपेक्षाभंग. त्यामुळे बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात. पॉर्नमधील तो पुरुष इतका वेळ सेक्स करू शकतो तर मग आपण का नाही?

 

पॉर्न मध्ये इतका वेळ सेक्स करण्याकरता त्यांनी काय काय औषधे आणि इंजेक्शन घेतलेली असतात याबद्दल माहिती वाचलीत तर डोळे पांढरे पडतील. त्यामधील काही लोक म्हणजेच पुरुष यांचे अनुभव कधी वाचा. केवळ कमीत कमी वेळामध्ये पैसा मिळवण्याकरता त्यांनी शरीराशी जे काही खेळ केलेले असतात इंजेक्शन्स आणि औषध घेऊन आणि त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घ्या. येथील स्त्रिया कशा पद्धतीने या सर्व गोष्टी करतात हे जाणून घ्या.

 

केवळ कमावलेले शरीर आणि मोठे लिंग असलेला पुरुष आणि उत्तान आणि मादक स्त्री यांना बघून हल्लीच्या मुलांच्या अपेक्षाही तशाच वाढलेले असतात. त्यातून हाती येते ते फक्त निराशा आणि मग डिप्रेशन असो.

 

आपल्याला दिसणारे पॉर्न इंडस्ट्री ही खूप छोटी आहे. डार्क वेब नावाचा प्रकार आहे जर कोणाला माहित असेल तर त्याला कळेल मी काय म्हणत आहे ते. आपण जे इंटरनेट बघतो तो फक्त एक पर्सेंट हिस्सा आहे. डार्क वेब हे 99% मोठे आहे आपण बघतो त्या इंटरनेट पेक्षा आणि तेथे पॉर्नच्या नावाने जे काही गुन्हे चालतात ते कधी ऐकलेत तरीदेखील आयुष्यामध्ये कधीही पॉर्न व्हिडिओ उघडायचे धाडस करणार नाही कोणीही. आणि ते डार्क वेब चालवणाऱ्या पॉर्न संस्था याच असतात. इकडून मिळालेले पैसे वापरून डार्क वेब वर काहीही केले जाते. ते आपले पैसे वापरूनच. डार्क वेब वर तुमच्या समोर प्रत्यक्ष बलात्कार, खून, हाल करणे, लहान मुलांवर अत्याचार हे केले जाते. त्यासाठी पॉर्न बघणारे मदत करीत असतात.

 

त्यामुळे पोर्न आणि व्हिडिओ गेम यामध्ये तुलना करने बालिशपणाचे आहे. प्रत्येक माणूस जो पॉर्न बघतो तो यामागील ब्लॅकमेलिंग बायकांना पळवणे लहान मुलांना पळवणे, त्यानंतर या इंडस्ट्रीत येण्यासाठी केले जाणार आहे बलात्कार या सगळ्याला पैसे देत असतो म्हणजेच स्वतः कारणीभूत होत असतो हे लक्षात घ्या मग यापुढे पॉर्न साईड उघडायचे धाडस करा.

Mayur Joshi

(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)

ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999


Tags: Mayur JoshimuktpeethmumbaiPornPorn Alertrapeपॉर्नपॉर्न'अलर्टबलात्कारमुक्तपीठ
Previous Post

नवनीत आणि रवी राणा यांची अटक बेकायदेशीर! वकिलांचा आरोप!!

Next Post

मोदींचे मंत्रीच मशिदीवरील भोंग्यांच्या रक्षणासाठी मनसेविरोधात उभे ठाकणार!

Next Post
Raj Thackeray on loudspeaker

मोदींचे मंत्रीच मशिदीवरील भोंग्यांच्या रक्षणासाठी मनसेविरोधात उभे ठाकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!