Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटाशी झुंजतानाच महापौरांचं नालेसफाईवरही लक्ष

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kishori pedanekar

मुक्तपीठ टीम

 

पावसाळा जवळ आला की मुंबईला वेध लागतात ते नालेसफाईचे. कारण मुंबईत पडणाऱ्या मोठ्या पावसाचे पाणी वाहून जाणे आवश्यक असते. या पाण्याच्या निचऱ्याचे काम मुंबईतील मोठे नाले करतात. सध्या कोरोना संकटाशी झुंजण्यात मुंबईच्या महापौर, आयुक्त आणि संपूर्ण टीम गुंतलेली आहे. त्यामुळे नालेसफाईचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेले काही दिवस नालेसफाईवर स्वत: देखरेख करत फिरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे याही वर्षी नालेसफाईची सुरुवात फेब्रुवारीतच झाली. कोरोनाच्या काळामध्येही नालेसफाईच्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे खंड न पडता नालेसफाईचे काम जोरात सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. आतापर्यंत मुंबईच्या पश्चिम उपनगरात ७२ टक्के नालेसफाईचा महापौरांनी दावा केला आहे.

उपनगरातील राजेंद्र नगर नालाच्या सफाई कामांची पाहणी करताना महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत ,स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) श्री. स्वप्निल टेंबवलकर व महापालिका अधिकारी उपस्थित होत्या. pic.twitter.com/ZbcdUrmbwa

— Kishori Pednekar (@KishoriPednekar) May 11, 2021

पश्चिम उपनगरातील काही नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौरांनी सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह केली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईतील नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचा दावाही महापौर किशोरी पेडणेकरांनी केला आहे. याआधी पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस पाण्याचा निचरा होत नसे. आता उदंचन केंद्रांच्या कामामुळे पाण्याचा निचरा हा दोन ते तीन तासांत होत असतो, असा दावाही त्यांनी केला.

 

दहिसर येथील दहिसर नदीवर पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेली बँड वॉल काढून टाकण्याचे निर्देशही महापौरांनी दौऱ्याच्यावेळी दिले. दहिसर गावठाणचा परिसर जलमय होणार नाही, यादृष्टीने काम लवकर पूर्ण करण्यासही महापौर किशोरी पेडणेकर यांनी बजावले आहे. मुंबईतील नालेसफाईच्या संपूर्ण कामावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष असून त्यादृष्टीने ते सतत नालेसफाई कामांचा आढावा घेत असल्याचे महापौरांनी सांगितले.

 

हिंदमाता परिसर पूरमुक्त करण्यासाठी टाकीचा प्रस्ताव

• दक्षिण मध्य मुंबईतील हिंदमाता परिसरात कायम पाणी साचते.
• तेथील पाणी साचण्याची समस्या लक्षात घेता, त्याठिकाणी स्टोरेज टँक बनविण्यात येणार आहे.
• या पावसाळ्यात मुंबईकरांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा मनपाचा प्रयत्न असणार आहे.

 

महापौरांच्या नाले सफाई दौऱ्यांमध्ये आमदार विलास पोतनीस , सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) पी. वेलरासू, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर , नगरसेविका रोहिणी कांबळे, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, उपायुक्त (परिमंडळ- ३) पराग मसुरकर, उपायुक्त (परिमंडळ -७ ) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा ) अनंत कदम, एच/ पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, एच/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, पी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आर/ मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर /उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (प.ज.वा.) व्यंकटेश कमलापुरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकार उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: dahisarMayor Kishori Pednekarmumbaiदहिसरहिंदमाता परिसर
Previous Post

हजारोंना सन्मानानं शेवटचा निरोप! पोलीस हेडकाँस्टेबलची माणुसकी!!

Next Post

संसर्गाच्या भीतीने आता लोकांचा कल मोठ्या घरांकडे

Next Post
real estate

संसर्गाच्या भीतीने आता लोकांचा कल मोठ्या घरांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!