Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

करण जोहरच्या पार्टीतील ‘तो’ मंत्री कोण…महापौरांच्या आव्हानानंतर शेलार नाव सांगणार?

आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mayor challenge, will shelar reveal name of minister in karan johar party

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरवणाऱ्या दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमुळे आता राजकारण तापू लागले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा आरोप केला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याच मुद्द्यावर शेलारांना आव्हान दिले आहे, नुसता आरोप करू नका. त्या पार्टीत कोण मंत्री होत, ते पुरावे देऊन सिद्ध करा, नाही तर मुंबईकरांची माफी मागा! महापौरांच्या या आव्हानानंतर तरी आमदार आशिष शेलार त्या मंत्र्याचे पुराव्यासह नाव उघड करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

महापौरांनी इतरही मुद्द्यांवर आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमदार, मंत्री झाला तरी तुमचा मुंबई मनपात जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा टोलाही लगावला आहे.

 

महापौरांचा शेलारांवर जोरदार हल्ला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक कोरोना असल्याने महाराष्ट्रालाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते वेगळेच वागतात.

पार्टीतील मंत्री कोण? पुराव्यासह सांगा, नाही तर माफी मागा!

  • बॉलिवूडच्या पार्टीत आघाडीचा मंत्री होता असा आरोप शेलार यांनी केला.
  • कोण मंत्री त्या पार्टीत होता हे आशिष शेलारांनी स्पष्ट करावं.
  • आशिष शेलार आणि इतर लोक बेछुट आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे.
  • तुमची ही कार्यपद्धती सर्वांना कळली आहे.
  • तुम्ही काय करता ते जनतेला कळलं आहे. शेलारांना सांगायचं आमदार झाला, मंत्री झाला पण जीव मात्र अजूनही महापालिकेत का घुटमळत आहे?
  • जर तुमचा जीव घुटमळत आहे. त्या जीवाला मोकळं करायचं असेल तर पुरावे देऊन आरोप सिद्ध करा.
  • उगाच आरोप करू नका. लोकशाहीने अधिकार दिला म्हणून कसाही आरोप कराल हे चालणार नाही.
  • संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान करू नका.
  • तुमच्याकडे पुरावे असेल तर दाखवा. कोण तरी होता कोण होते. याचा पुराव्यासह सिद्ध करा!

 

भाजपाचे ८३ नगरसेवक करतात तरी काय?

  • भाजपाचे नगरसेवक स्थायी समितीत बसतात.
  • त्यावेळी ते काय करतात? त्या क्षणाला विरोध का करत नाही.
  • ते अकार्यक्षम आहे का? त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का?
  • तुमचे ८३ नगरसेवक अकार्यक्षम आणि तुम्हीच हुशार का?
  • घोटाळ्याचे आरोप हवेत करू नका.
  • स्वत: घोटाळे करता आणि दुसऱ्यावर आरोप करता हे आता बंद करा.

 

तुमच्या आरोपांनी खचणार नाही!

  • सत्ता सर्वांनाच हवी असते. पण तुम्हाला तर हवीच हवी आहे.
  • त्यामुळे तुम्ही कसेही हवी होत आहात.
  • तुम्ही माझ्यावर शिंतोडे उडवले. मी ते बघेनच.
  • मी नुसती बघणार नाही आमचा पक्ष, महिला आघाडी आणि सरकार बघून घेईल.
  • तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही.
  • शिवसेनेच्या रणरागिनी आहोत आम्ही.

 

महाराष्ट्राची माफी मागा!

  • आता चॅलेंज आहे. तुम्ही जी एक पुडी सोडली आहे, आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं काम तुम्ही केलं आहे.
  • नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. घोटाळ्याचे नुसते आरोप करू नका.
  • नक्की कोण होता याचा उलगडा कराच नाही तर जनतेची माफी मागा. नुसतं बोलू नका!

Previous Post

नाना पटोलेंचं अमित शाहांना आव्हान: राज्यातच कशाला देशातच निवडणुका घ्या!

Next Post

सामान्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘गावापर्यंत प्रशासन’ देशव्यापी मोहीम

Next Post
Good Governance Week

सामान्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘गावापर्यंत प्रशासन’ देशव्यापी मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!