Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘गावापर्यंत प्रशासन’ देशव्यापी मोहीम

December 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
Good Governance Week

मुक्तपीठ टीम

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG), परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून २०-२५ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह साजरा करणार आहे.

 

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रतील भीम सभागृह येथे सुशासन सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे होते. यावेळी “शासनाची बदलती प्रतिमा” या सुशासन पद्धतीवरील प्रदर्शनाचे त्यांनी उद्घाटन केले. तसेच डॉ जितेंद्र सिंह गुड गव्हर्नन्स वीक पोर्टल सुरु केले. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या २ वर्षांच्या कामगिरीवरील पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी “प्रशासन गाव की ओर ” हा चित्रपट दाखवण्यात आला.

 

“सुशासन सप्ताह”च्या यशासाठी शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “स्वातंत्र्याच्या अमृत कालखंडात, आपण सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पारदर्शक व्यवस्था, कार्यक्षम प्रक्रिया आणि सुरळीत प्रशासन निर्माण करण्यासाठी वेगाने पुढे जात आहोत. या संदर्भात, या सप्ताहाची संकल्पना—प्रशासन गाव की ओर अर्थात गावापर्यंत प्रशासन ही अधिक प्रासंगिक ठरत आहे”

 

सुशासन सप्ताहाची संकल्पना आहे “प्रशासन गाव की ओर अर्थात गावापर्यंत प्रशासन ” – सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी एक देशव्यापी मोहीम देशातल्या सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केली जाईल. “प्रशासन गाव की ओर ” मध्ये देशातील ७०० हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत आणि आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात तक्रारींचे वेळेवर निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी ते तहसील/पंचायत समिती मुख्यालयाला भेट देतील.

 

२५ डिसेंबर २०२१ रोजी, “सुशासन दिन” साजरा केला जाईल. या प्रसंगी, “सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की ओर” या विषयावरील चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि “गुड गव्हर्नन्स इंडेक्स- राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाचे मूल्यांकन” सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्रीअमित शाह, डॉ. जितेंद्र सिंह, २५ डिसेंबर २०२१ रोजी विज्ञान भवन येथे “सुशासन दिन” च्या समारोप सत्रात सहभागी होतील.

 

केंद्र सरकारची सर्व मंत्रालये/विभाग, सर्व राज्य सरकारे आणि जिल्हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


Tags: Good Governance Weekगुड गव्हर्नन्स वीकसुशासन सप्ताहस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
Previous Post

करण जोहरच्या पार्टीतील ‘तो’ मंत्री कोण…महापौरांच्या आव्हानानंतर शेलार नाव सांगणार?

Next Post

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हिंदुत्वाशी तडजोड, मग भाजपाही १९८७च्या ऐतिहासिक चुकीसाठी माफी मागणार?

Next Post
bjp's mistake in 1989 hindutva election

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हिंदुत्वाशी तडजोड, मग भाजपाही १९८७च्या ऐतिहासिक चुकीसाठी माफी मागणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!