मुक्तपीठ टीम
पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील आदिवासी आणि गरिब मुलांच्या विवाहासाठी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मनसेने आयोजित केलेला आदिवासी वधू- वरांचा ‘सामूहिक विवाहसोहळा’ रविवारी १३ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. याप्रसंगी वधू- वरांना आशीर्वाद देण्यासाठी शर्मिला ठाकरे आवर्जून उपस्थित होत्या. हे आयोजन विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाजवळील सूरकर मैदानात करण्यात आले होते.
पक्षाचे नेते आमदार श्री. प्रमोद (राजू) पाटील, सरचिटणीस सौ. रिटा गुप्ता आणि या ‘सामूहिक लग्नसोहळ्या’चे आयोजक ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.#सामूहिक_विवाह_सोहळा #MNSAdhikrut pic.twitter.com/7qWmCLTtOq
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2022
आदिवासी कुटुंबाना हातभार लावण्यासाठी मनसेच्या वतीने हा सोहळा आयोजित केला होती. अतिशय शाही पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्याचे सर्वांनी कौतुक केले. या सोहळ्याला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. तसेच पक्षाचे नेते आमदार प्रमोद (राजू) पाटील, सरचिटणीस रिटा गुप्ता आणि या ‘सामूहिक लग्नसोहळ्या’चे आयोजक ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
पालघर मधील विक्रमगड येथेमनसेतर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. साडेसातशेपेक्षा अधिक आदिवासी दाम्पत्यांचा विवाह सोहळा पार पडला. साडेसातशे पेक्षा जास्त नवदांपत्यांना यावेळी जीवनावश्यक साहित्याच वाटप देखील मनसेतर्फे करण्यात आले. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी एका नवदाम्पत्याचे कन्यादान केल असून ही भावना बोलता न येण्यासारखी असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. तसेच जव्हार, मोखाडा , विक्रमगड या ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने लग्न आम्ही करून देऊ मात्र सरकारने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा खोचक टोला यावेळी शर्मिला ठाकरे यांनी लागवत पालघर मधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे आवाहन सरकारला त्यांनी केले.