Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाला पुरस्कार, बारामतीत सुनंदाताई पवारांच्या हस्ते सत्कार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Mrudula Shilimkar

मुक्तपीठ टीम

मृदुला शिळीमकर…जी आपल्या भावासोबत हायवेवर भाजीचा धंदा करतेय, त्यावेळीच ती बीबीए पदवीचंही शिक्षणही घेतेय…जीवनातलं तिचं एकचं ध्येय, तिला जास्तीत जास्त पुढे जायचं आहे. तिची सध्याची परिस्थिती बदलून स्वबळावर चांगली करायची आहे. अशा मृदुलाची कहाणी मुक्तपीठने आपल्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात मांडली होती. या चांगल्या बातमीचा सुगंध सर्वत्र दरवळला. बारामतीत शारदा सन्मान सोहळ्यात तिचाही गौरव झाला. सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

सूनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी हा कार्यक्रम बारामतीतील आप्पासाहेब पवार सभागृह येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. पूर्ण महाराष्ट्रामधून एकूण २० महिलांचा सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या २० महिलांमध्ये मृदुलाचाही समावेश होता. मुक्तपीठने मृदुलाची बातमी केली आणि या बातमीच्या आढावा घेत तिला बारामती येथे आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये तिच्या कामगिरी बद्दल सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देण्यात आला.

 

आत्ताच मागे मुक्तपीठने तिच्या जीवनावर आणि तिच्या भावी स्वप्नांबद्दल गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात माहिती दिली. गुड न्यूज मॉर्निंगचा तिचा व्हिडीओ सुनंदा ताई पवार यांच्यापर्यंत पोहचला आणि तो पाहून ती या पुरस्काराची पात्र ठरली. तिचा हा व्हिडिओ तुळशीदाक भोईटे सर यांनी काढला होता. आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले असे सांगत मृदुलाने त्यांचे आभार मानले. तिने याचे श्रेय तिच्या आईला दिलं कारण तिच्या डोळ्यासमोरच एक सक्षम आणि कर्तृत्ववान स्त्री तिची आई एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आईन काम करण्यासाठी कधी लाजू नये हा मोलाचा सल्ला कायम दिला.

 

कोण आहे मृदुला शिळीमकर?

  • मृदुला पुण्यातील केळवडे येथिल रहिवासी.
  • भाजीचा छोटासा व्यवसाय ती करतेय.
  • ती सध्या बीबीएच्या पहिल्या वर्षी आहे.
  • मृदुलाचे कुटुंब शेतकरीच आहे.
  • वडिलांचं निधन झाल्यामुळे आईला हातभार लावण्यासाठी ती आणि तिचा भाऊ भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. मृदुलाला पुढे फायनान्स घेवून बॅंकिंग करायचे आहे.
  • मृदुलाच्या जीवनातलं एकचं ध्येय आहे जे तिला जास्तीत जास्त पुढे जायचं आहे.
  • यासाठी ती चांगलं शिक्षणं घेणार आहे.
  • तिचे सरहद कॉलेजही चांगले आहे, त्यांच्याकडूनही सहकार्य लाभतं.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Award Ceremonybaramatigood newsGood News Morning Star MrudulaMrudula ShilimkarmuktpeethReceptionSunandatai Pawarगुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाचांगली बातमीपुरस्कार सोहळाबारामतीमुक्तपीठमृदुला शिळीमकरसत्कार समारंभसुनंदाताई पवार
Previous Post

लग्नखर्चातून वाचवण्याचा ‘मनसे’ प्रयत्न, शर्मिला राज ठाकरेंच्या आशीर्वादाने सामूहिक विवाह!

Next Post

भारतात रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ मॉडेल लाँच, चाहत्यांसह जबरदस्त राइडसाठी सज्ज!

Next Post
Royal Enfield Scram 411

भारतात रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ मॉडेल लाँच, चाहत्यांसह जबरदस्त राइडसाठी सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!