मुक्तपीठ टीम
मारुती सुझुकीने आपली एंट्री लेव्हल हॅचबॅक कार एस-प्रेस्सो अपडेट केली आहे आणि ती नवीन शैलीत बाजारात लाँच केली आहे. कंपनीने चांगली पॉवर इंजिन आणि मायलेजसह बाजारात सादर केली आहे. कंपनीने नवीन एस-प्रेस्सो मध्ये अनेक फीचर्स अपडेट केले आहेत. नवीन मारुती एस-प्रेस्सो १.०-लिटर के-सीरीज ड्युअल जेट ड्युअल वीवीटी पेट्रोल इंजिनसह सादर केली आहे.
- देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने एंट्री-लेव्हल हॅचबॅक एस-प्रेस्सोची नवीन मॉडल कार बाजारात आणली आहे.
- नवीन कारची शोरूम किंमत ४.२५ ते ५.९९ लाख रुपये आहे.
- या मॉडेलच्या ऑटोमॅटिक गियर शिफ्ट व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ५.६५ लाख आणि ५.९९लाख रुपये आहे.
- मारुती सुझुकीच्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत एस-प्रेस्सोच्या २,०२,५०० युनिट्सची विक्री केली आहे.
- 1.0 के-सिरीज इंजिनसह नवीन एस-प्रेस्सो ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव वाढवेल.
- कंपनीने स्पष्ट केले की हे मॉडेल मानक म्हणून ड्युअल एअरबॅग्ज, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारख्या फिचर्सनी सुसज्ज आहे.