मुक्तपीठ टीम
कार घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु, सध्याच्या महागाईमुळे आणि अतर कारणांमुळे काहींचे ते स्वप्नच बनून राहते. पण, आता चिंचेती बाब नाही. स्वप्न पूर्ण होत नाही. मारुती सुझुकीच्या नव्या योजनेने कारचे स्वप्न सत्यात उतरवता येईल. मारुती सुझुकी आणि महिंद्रा फायनान्सने क्विकलीजच्या सहकार्याने एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहक स्वस्त मंथली सबस्क्रिप्शन प्लॅनवर कार त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात.
मारूती सुझुकीची ससब्सक्रिप्शन प्लान सेवा या शहरात होणार लागू
- मारुती सुझुकीचा हा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सध्या देशातील २० शहरांमध्ये उपलब्ध आहे.
- ज्यामध्ये दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, इंदूर, मंगळुरू, म्हैसूर आणि कोलकत्ता या शहरांचा समावेश आहे.
वाहन सब्सक्रिप्शन प्लानचे फायदे
- ग्राहकांना त्यांची मुदत संपेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या वाहनाच्या नवीन मॉडेलमध्ये परत जाण्याचा, खरेदी करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा पर्याय निवडता येईल.
- ग्राहक क्विकलीज प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या पसंतीचे वाहन घेऊन जाणे निवडू शकतात.
- भाड्यावर वाहन घेतलेल्या कालावधीसाठी, ग्राहकाला वाहन बदलणे, दुसरे निवडणे, परत करणे किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय असेल.
सबस्क्रिप्शन प्लानला वाढता प्रतिसाद
- एमएसआयएलने जुलै २०२० मध्ये त्यांचा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू केला, ज्या अंतर्गत ग्राहक मंथली सबस्क्रिप्शन प्लॅनवर मारुती सुझुकीची वाहने त्यांच्या घरी भाड्याने घेऊ शकतात.
- कंपनीने चालवलेली ही योजना मंथली आधारावर निश्चित किंमत देऊन घरी घेऊन जाता येतात आणि कालावधी संपल्यानंतर ती परत करू शकता किंवा निश्चित किंमत पुन्हा भरल्यानंतर कार सबस्क्रिप्शननुसार ताब्यात घेऊ शकता.
मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या माहिती आणि फीडबॅकवर आधारित आमचा वाहन सबस्क्रिप्शन प्रोग्राम सतत अपग्रेड करत आहोत. यामुळे आम्हाला कोलकत्तासारख्या नवीन बाजारपेठांमध्ये मारुती सुझुकीचे सबस्क्रिप्शन वाढवण्यास आणि महिंद्रा फायनान्सच्या सहकार्याने क्विकलीजसह भागीदारी करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.”
पाहा व्हिडीओ :