मुक्तपीठ टीम
मारुती सुझुकीने भारतात एस-प्रेस्सोचे नवीन सीएनजी मॉडेल लाँच केले आहे. एस-सीएनजी मॉडेल LXi आणि VXi या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची सुरुवातीची किंमत ५.९० लाख रुपये आहे. VXi व्हेरिएंटची किंमत ६.१० लाख रुपये आहे. के-सीरीज १.० -लिटर पॉवर्ड वाहन कमाल ५६बीएचपी पर्यंत पॉवर जनरेट करू शकते.
एस-प्रेस्सो, एस-सीएनजीची काही खास फिचर्स…
- कार ३२.७३ केएमपीएलचा मायलेज देईल.
- यात १.० लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळेल.
- वाहनाचे इंजिन ८२.१ एनएम पर्यंत पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.
- ग्राहकांच्या राईडची गुणवत्ता वाढवण्यासाठी मारुती सुझुकीने एस-प्रेस्सोचे सीएनजी मॉडेल लाँच केले आहे.
पेट्रोल मॉडेलमध्ये २१.७ केएमपीएल मायलेज
- एस-प्रेस्सोच्या सीएनजी मॉडेलचा टॉप स्पीड १४८ केएमपीएल आहे.
- कार ३२.७३ केएमपीएल मायलेज देईल.
- पेट्रोल व्हेरिएंटमध्ये, २१.७ केएमपीएलचा मायलेज मिळत आहे.
- ५-स्पीड गियर सिस्टीमसह या वाहनाची इंधन टाकी क्षमता ५५ लिटर आहे.
मारुती सुझुकीची ही १०वी सीएनजी कार
- मारुती सुझुकीने यापूर्वी ९ कारचे सीएनजी मॉडेल सादर केले होते.
- एस-प्रेस्सोचे नवीन मॉडेल कंपनीचे १० वे सीएनजी मॉडेल आहे.
- यामध्ये ड्युअल इंटरडिपेंडेंट इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट (ECU), इंटेलिजेंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, स्टेनलेस स्टील पाईप्स आणि सीएनजीसाठी विकसित इंटिग्रेटेड वायरिंग हार्नेस सिस्टीमसह जॉइंट्स मिळतील.
- एम-सीएनजी मायक्रो स्वीच देखील देण्यात आला आहे.
- या स्वीचमुळे इंजिन चालू आणि बंद करता येईल.
- सीएनजी इंधन भरताना वाहनाचे इंजिनही आपोआप सुरू होईल.
पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ४.९५ लाख
- एस-प्रेस्सोचे पेट्रोल व्हेरिएंट ४.९५ लाख रुपये आहे.
- सीएनजी व्हेरियंटपेक्षा ९५ हजार रुपये स्वस्त आहे.
- कारच्या पेट्रोल व्हेरियंटचे २.२६ लाख युनिट्स विकले गेले आहेत.
- एस-प्रेस्सोचे सीएनजी मॉडेल रेनॉ क्विड, मारुती सुझुकी अल्टो के१० सारख्या गाड्यांना टक्कर देणारे असल्याचे मानले जाते.
- यापैकी एकाही कारचे सीएनजी मॉडेल लाँच करण्यात आलेले नाही.