Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील अॅक्शन ड्रामा संपताच २ मराठी चॅनल्सना फटका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TRP rating Week 29

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष आता अॅक्शन ड्रामाकडून न्यायालयीन लढाईकडे वळला आहे. त्याचा फटका दोन मराठी चॅनल्सना बसल्याचं दिसत आहे. टीव्ही ९ मराठी पहिल्या क्रमांकावरच असलं तरी त्या चॅनलचा मार्केट शेअर गेल्या आठवड्याच्या २९.१वरून २७.९ टक्क्यांवर आला आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझा हे चॅनल आणखी घसरले आहे. सत्तासंघर्षाच्या काळात २१ टक्क्यांच्यापुढे झेपावलेले हे चॅनल आता २०.९वर आले आहे. त्याचवेळी झी २४ तास मात्र २६.३ वरून २६.९ वर, साम १२.२ वरून १२.६ तर न्यूज १८ लोकमत ११.२ वरून ११.६ टक्क्यांवर वाढलं आहे.

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केटमध्ये काय घडलं, काय बिघडलं?

  • या वर्षाच्या २९व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये १.२ टक्क्याची घट झाल्यानंतरही २७.९ टक्के मार्केट शेअरसह टीव्ही 9 मराठी नंबर १ आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासचा मार्केट शेअर ०.६ ने वाढून २६.९वर पोहचला आहे. गेले ३ आठवडे टीव्ही ९ घसरत असताना २४ तास वाढ नोंदवत आहे.
  • एबीपी माझा ०.४ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर २०.९ टक्क्यांसह आहे.
  • साम ०.४ ची वाढ नोंदवत नोंदवत १२.६ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूज 18 लोकमत ०.४ ची वाढ नोंदवत ११.२ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही. ते लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

अॅक्शन ड्रामा संपल्याचा २ मराठी चॅनल्सना फटका?

  • महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात आधी अॅक्शन ड्रामा होता.
  • जेव्हाही बाहेर घडामोडी जास्त असतात तेव्हा ज्यांच्याकडे साधनं जास्त, मनुष्यबळ जास्त त्यांना सर्वाधिक फायदा होतो. अर्थात प्रत्येक चॅनलच्याबाबतीत तसं नसल्याचंही दिसतं. काही साधनं असूनही करून दाखवू न शकणारेही असतात.
  • राजकीय संघर्षातील घडामोडी कमी होताच कव्हरेजची संधीही कमी झाली.
  • आता हा राजकीय संघर्ष न्यायालयीन लढाईकडे वळला आहे.
  • त्याचा फटका दोन मराठी चॅनल्सना बसल्याचं दिसत आहे.
  • टीव्ही ९ मराठी पहिल्या क्रमांकावरच असलं तरी त्या चॅनलचा मार्केट शेअर गेल्या आठवड्याच्या २९.१वरून २७.९ टक्क्यांवर आला आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझा हे चॅनल आणखी घसरले आहे.
  • सत्तासंघर्षाच्या काळात २१ टक्क्यांच्यापुढे झेपावलेले हे चॅनल आता २०.९वर आले आहे.

खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील २९ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग २६, २७, २८ आणि २९ या चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असत नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

गेल्या आठवड्यात मराठी न्यूज चॅनल्सची काय स्थिती होती?

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा न्यूज चॅनल्सना मोठा फायदा! मनोरंजन वाहिन्यांशी स्पर्धा करणारी प्रेक्षकसंख्या!!

 

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:

टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?


Tags: Marathi News channel Tv RatingMarathi News ChannelsTV Ratingटीव्ही रेटिंगमराठी न्यूज चॅनल्समराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग
Previous Post

आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Next Post

राज्यात २२०३ नवे रुग्ण, २४७८ रुग्ण बरे! मुंबई २८१, नाशिक ४४, नागपूर १०९ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २२०३ नवे रुग्ण, २४७८ रुग्ण बरे! मुंबई २८१, नाशिक ४४, नागपूर १०९ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!