Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा न्यूज चॅनल्सना मोठा फायदा! मनोरंजन वाहिन्यांशी स्पर्धा करणारी प्रेक्षकसंख्या!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TRP rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा मराठी न्यूज चॅनल्सना चांगलाच फायदा झालेला दिसत आहे. मराठी न्यूज चॅनल्सच्या प्रेक्षक संख्येत या आठवड्यात दणदणीत वाढ झाली आहे. त्यातही १५ वर्षे वयावरील टार्गेट ग्रुपमध्ये पहिल्या क्रमाकांवरील टीव्ही ९ मराठीची प्रेक्षक संख्या ही ८ कोटींवर झेपावली आहे. त्यांच्या मागोमाग असलेल्या झी २४ तास हे चॅनल ७ कोटी २० लाखांवर पोहचले आहे. तसेच एबीपी माझा ५ कोटी ९० लाखांवर, साम ४ कोटींजवळ आणि न्यूज १८ लोकमतही ३ कोटी प्रेक्षकसंख्येवर आहेत. २+ टार्गेट समूहात हीच संख्या आणखी जास्त आहे.

किती मराठी प्रेक्षक कोणतं मराठी न्यूज चॅनल पाहतात?

(15+ TG) हा महत्वाचा लक्ष्य समूह आहे

  • टीव्ही 9 मराठी – ८ कोटी
  • झी २४ तास – ७ कोटी २० लाख
  • एबीपी माझा – ५ कोटी ९० लाख
  • साम – ३ कोटी ३० लाख
  • न्यूज 18 लोकमत – ३ कोटी १० लाख

(2+ TG) हा लक्ष्य समूह तसा न्यूज चॅनल्ससाठी तेवढा महत्वाचा नसतो.

  • टीव्ही 9 मराठी – ९ कोटी १५ लाख
  • झी २४ तास – ८ कोटी ४४ लाख
  • एबीपी माझा – ६ कोटी ६६ लाख
  • साम – ३ कोटी ९० लाख
  • न्यूज 18 लोकमत – ३ कोटी ५४ लाख

 

  • या वर्षाच्या २८व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये ०.३ टक्क्याची घट झाल्यानंतरही २९.१ टक्के मार्केट शेअरसह टीव्ही 9 मराठी नंबर १ आहे, दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासचा मार्केट शेअर ०.५ ने वाढून २६.३वर आहे. एबीपी माझा ०.३ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर २१.३ टक्क्यांसह आहे. साम ०.१ची घट नोंदवत १२.२ टक्क्यांसह चौथ्या आणि न्यूज 18 लोकमत ०.२ ची वाढ नोंदवत ११.२ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही. ते लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील २८ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग २५, २६, २७ आणि २८ या चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:

टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?

 


Tags: MaharashtraMarathi News ChannelMarathi News channel Tv Ratingtulsidas bhoiteTV 9TV Ratingटीव्ही रेटिंगतुळशीदास भोईटेमराठी न्यूज चॅनल्समराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंगमहाराष्ट्र
Previous Post

ईडी कार्यालयात सोनिया गांधींची चौकशी, बाहेर अटक करवून घेण्यासाठी नेत्यांची गर्दी!

Next Post

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू! जाणून घ्या संघर्ष…सारं गमावण्याच्या शुन्यातून राष्ट्रपतीपदाच्या शिखरापर्यंतचा!

Next Post
Draupadi Murmu Strugle

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू! जाणून घ्या संघर्ष...सारं गमावण्याच्या शुन्यातून राष्ट्रपतीपदाच्या शिखरापर्यंतचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!