Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

March 31, 2022
in featured, सरळस्पष्ट
0
TV rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

टीव्ही न्यूज चॅनल्सचं रेटिंग सुरु झाल्यापासून आता तिसऱ्या आठवड्याचे आकडे जाहीर झाले आहेत. टीव्ही 9 मराठी हे न्यूज चॅनल कौतुकास्पदरीत्या पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, त्याचवेळी गेले तीन आठवडे सातत्यानं रेटिंगमध्ये वाढ नोंदवणारं झी २४ तास हे न्यूज चॅनलने या आठवड्यातही पुढे झेप घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये त्यांची वाढ अशीच राहिली तर हे चॅनल टीव्ही 9 मराठीच्या सध्याच्या स्थानासाठी धोका ठरू शकतं. या आठवड्यात झी २४ तास आणि साम या दोन चॅनल्सच्या रेटिंगमध्येच वाढ दिसली आहे. तर उरलेले चार चॅनल्सच्या रेटिंगमध्ये किंचित का होईना घटच झाली आहे.

सातत्यपूर्ण वाढ होणारे झी २४ तास एकमेव चॅनल!

  • आठवडा – १० २६.४
  • आठवडा -११ २६.८
  • आठवडा -१२ २७.०

 

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.१ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे. त्यांच्यात ०.३ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २७% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.२ ची वाढ आहे.
  • एबीपी माझा १८.७ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
  • चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही १२.१% मार्केट शेअरसह आहे.त्यांच्यात ०.२ची वाढ आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ८.५ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.
  • सहाव्या क्रमांकावर नव्यानं सुरु झालेलं लोकशाही न्यूज चॅनल ५.५ % मार्केट शेअरसह आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.

 

समजून घ्या कोणाचं कसं?

  • पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9च्या रेटिंगमध्ये ०.३ अशी घट होत असताना दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासच्या मार्केट शेअरमध्ये ०.२ची वाढ झाली आहे.
  • त्यामुळे आता दोघांमधील फरक आणखी कमी होत १.१ वर आला आहे.
  • सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने झी २४ तास हा टीव्ही 9च्या पहिल्या स्थानासाठी धोका ठरु शकतो.
  • एबीपी माझासाठी १२ वा आठवडाही चांगला ठरलेला नाही. ते पुढे सरसावण्याऐवजी ०.१ने किंचित मागे गेले आहेत.
  • साम या न्यूज चॅनलने या आठवड्यात ०.२ची वाढ नोंदवलेली आहे.
  • न्यूज 18 लोकमत, लोकशाही हे दोन्ही न्यूज चॅनल्सच्या मार्केट शेअरमध्ये या आठवड्यात ०.१ची किंचित घट झालेली आहे

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

 

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

 

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

 

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

गेल्या आठवड्यात किती होतं कुणाचं रेटिंग?

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

 

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.

नक्की पाहा:

 


Tags: ABP MAZAmuktpeethSaralSpasthaTulsidas V. BhoiteTV RatingTV9Zee 24 Taasएबीपी माझाझी २४ तासटीव्ही 9तुळशीदास भोईटेमुक्तपीठ
Previous Post

रामदेव बाबांचा भारतीयांना फुकटचा सल्ला: “पेट्रोल डिझेल महागत आहे, तर जास्त कष्ट करा, उत्पन्न वाढवा!”

Next Post

पुण्यासाठी अडीच हजार कोटींच्या पीएमआरडीए अंदाजपत्रकास मान्यता

Next Post
PMRDA budget of Rs 2,500 CR approved for Pune

पुण्यासाठी अडीच हजार कोटींच्या पीएमआरडीए अंदाजपत्रकास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!