Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला

February 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
maratha

मुक्तपीठ टीम

 

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर आज सुनावणी झाली. संपूर्ण राज्याचे या सुनावणीकडे लक्ष होते. मात्र, या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली असून अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यानच सकारात्मक संकेत देत तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजे तोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असेल असे सांगितले.

 

तर राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांचे प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली होती.

 

“८ मार्चला प्रत्यक्ष सुनावणीस सुरुवात झाली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल”,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

८, ९ आणि १० तारखेला याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला आहे. तर १२, १५. १६ आणि १७ मार्च या तारखेला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच १८ मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल, आणि त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाईल असे न्यायालायाने सांगितले आहे.


Tags: Maratha Reservationsuprem courtमराठा आरक्षणमराठा क्रांतीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही…

Next Post

#शेतकरीआंदोलन संजय राऊतांचा भाजपला प्रश्न: “जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही कसा?”

Next Post
Sanjay Raut

#शेतकरीआंदोलन संजय राऊतांचा भाजपला प्रश्न: “जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही कसा?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!