Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही…

February 8, 2021
in मस्तच
0
n rajam

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा  यावर्षीचा  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर करण्यात आला आहे.  पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख  यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली असून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद फय्याज हुसेन खाँ, पं. उद्धव आपेगावकर, डॉ. राम देशपांडे, श्री श्रीनिवास जोशी यांचा  पुरस्कार निवड समितीत  समावेश होता. समितीने सन २०२० साठीच्या पुरस्कारासाठी  एन राजम यांची निवड केली.

 

एन. राजम यांची संगीतसेवा

  • एन. राजम या व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय मानल्या जातात
  • त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडे कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिनचे शिक्षण सुरू केले.
  • त्यांची तयारी बघून वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांना अनेक  मोठ्या कलाकारांसोबत साथ करण्यासाठी भारतभर दौरे करण्याची संधी मिळाली.
  • पं. ओंकरनाथ ठाकूर यांच्या गायकीने प्रभावित झाल्यामुळे त्या हिंदुस्तानी  संगीताकडे आकर्षित झाल्या.
  • पं. ओंकारनाथ ठाकूर त्यावेळी बनारस हिंदू विश्वविद्यालयात अध्यापन करीत असल्यामुळे, त्यांच्याकडे शिक्षण घेता यावे म्हणून एन. राजम यांनी तिथे प्रवेश घेतला.
  • पंडित  ठाकूर ह्यांच्याकडे  शिक्षण  घेतल्यामुळे त्यांच्या वादनावर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव पडला.
  • गायकी अंगाने अत्यंत सुरेलपणे वादनासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
  • तेथील शिक्षणानंतर त्यांनी तिथेच  ‘फाईन आर्टस’ विभागात अध्यापनाला सुरुवात केली आणि नंतर त्या  विभागप्रमुख झाल्या.
  • सोबतच  मंचीय प्रदर्शनासाठी त्यांना देश – विदेशातून निमंत्रणे येऊ लागली व त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
  • सुमारे चार दशके बनारस विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्य केल्यानंतर त्या  गेली वीसहून अधिक वर्षे मुंबईत वास्तव्यास आहेत.
  • कन्या संगीता शंकर व नाती नंदिनी व रागिणी शंकर यांना व्हायोलिन वादनाचे शिक्षण त्यांनी दिले. आज त्या उत्तम वादक म्हणून ओळखल्या जातात.
  • त्याशिवाय इतर अनेक शिष्य त्यांनी घडवले.  नवोदित गुणवंताना वाव देण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
  • नवोदित कलाकारांच्या स्पर्धा आयोजित करणे, त्यांच्या कॅसेट व सीडीज स्वतः रेकॉर्ड करून घेऊन त्या प्रदर्शित करणे आदि अनेक प्रकारे प्रोत्साहन दिले.
  • शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला महाराष्ट्र सरकारकडून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन २०१२-१३ पासून देऊन गौरविण्यात येते. विदुषी एन. राजम यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

आतापर्यंत गौरवण्यात आलेले मान्यवर:

  • श्रीमती किशोरी आमोणकर
  • पं. जसराज
  • श्रीमती प्रभा अत्रे
  • पं. राम नारायण
  • श्रीमती परविन सुलताना
  • श्रीमती माणिक भिडे
  • पं केशव गिंडे
  • पं. अरविंद परिख

Tags: amit deshmukhdr.N.rajampandit bhimsen joshiअमित देशमुखडॉ. एन. राजमपंडित भीमसेन जोशी
Previous Post

महाराष्ट्राला परदेशातून कोरोनाच्या नव्या संसर्गाचा व्हाया परराज्य धोका!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला

Next Post
maratha

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!