खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आपण उद्विग्न झालो असल्याचे सांगत त्यांनी ही घोषणा केली आहे. ती करताना आपण एकट्याने हे पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण त्यानंतर महाराष्ट्रभरातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्या मुंबईचं आझाद मैदान भरून ओसंडून जाईल असं दाखवणाऱ्या आहेत. संभाजी छत्रपती प्राण पणाला लावत असताना आता तरी मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळणार का, की दरवेळी प्रमाणे मतांसाठी आरक्षण आणि निवडणुकीनंतर होवू द्या मरण, रचा सरण, अशीच राजकीय पक्षांची वृत्ती कायम राहणार असा प्रश्न समोर आला आहे. मराठा समाजासाठीच हा प्रश्न महत्वाचा नाही. त्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी लागेल, म्हणजे इतर समाजाच्या आरक्षणावर आलेले संकट, मग ते ओबीसींचे राजकीय असो वा अन्य आपोआपच दूर सरेल. पण राजकीय पक्ष तसं होवू देतील की भिजतं घोंगडं तसंच राखतील. या मु्द्द्यावर संभाजी छत्रपतींचे वक्तव्य, राज्यसभेत त्यांना संधी नाकारल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रयत्नांमुळे संधी मिळाल्यावर त्यांनी केलेले भाषण यासह मराठा सेवक योगेश केदार आणि गणेश गोळेकर यांच्यासह सरळस्पष्ट चर्चा.