मुक्तपीठ टीम
मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्यांवर अखेर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मराठी एकीकरण समितीने यावर आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल केला आहे. मराठी माणसांना घर नाकारल्याची ऑडिओ क्लिीपही व्हायरल झाली होती. त्याची दखल घेऊन मराठी एकीकरण समितीने नयानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचं गांभीर्यही लक्षात घेता भादंवि कलम १५३ अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.
मराठी माणसाला घर नाकारले, मराठी एकीकरण समितीकडून गुन्हा दाखल!#महाराष्ट्र #मुंबई
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) October 11, 2021
काय आहे संपूर्ण प्रकरण?
- मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सोशल मीडियावर रिंकू संगोई देढीया यांची घर विक्रीसंबंधातील एक पोस्ट वाचली.
- यात मिरा रोड येथील एका फ्लॅट विक्रीसंदर्भात लिहिण्यात आले होते, परंतु, हा फ्लॅट केवळ गुजराती, जैन आणि मारवडी समाजातील व्यक्तीनाच विकायचा असल्याचे नमूद करण्यात आले होते.
- देशमुख यांनी यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला असता देशमुख यांना संबंधित सोसायटीत मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन आदी लोकांना फ्लॅट विकत नाहीत.
- तसा सोसायटीचा नियम आहे.
- सोसायटीत केवळ गुजराती, जैन आणि मारवाडी व्यक्तींनाच फ्लॅट विकला जातो.
- त्यामुळे तुम्हाला फ्लॅट विकता येणार नाही, असे देशमुख यांना सांगण्यात आले.
- याप्रकरणी गोवर्धन देशमुख यांनी आपले सहकारी प्रदीप सामंत आणि सचिन घरत यांच्यासह नयानगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
- याप्रकरणी पोलिसांनी राहुल देढीया आणि रिंकू संगोई देढीया यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे .