मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिजीत बॅनर्जी व कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
तृणमल कार्यकर्त्यांवर आधी हल्ला, मग अटकही!
- त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यात “कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल” तृणमूल काँग्रेसच्या १४ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रविवारी अटक करण्यात आली.
- या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, ‘त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा मी निषेध करते, ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे.
- तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला करण्याचे आदेश देण्याचे धाडस त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.
- तिथे अभिषेक बॅनर्जीच्या जीवाला धोका होता.
- ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात त्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे जे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यकर्त्यांच्या कथित हल्ल्यात जखमी झाले होते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
२०२३च्या त्रिपुरा निवडणुकीसाठी संघर्ष
- २०२३ मध्ये त्रिपुरामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी, पक्ष राज्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
- शासकीय रुग्णालय एसएसकेएममध्ये तृणमूलच्या जखमी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या की, त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश आणि जेथे भाजपची सत्ता आहे तेथे अनागोंदी कारभार आहे.
- अभिषेक आणि आमच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय असे हल्ले करता येत नाहीत.
- त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत.
- पोलीस या वेळी बघ्याच्या भुमिकेत होते.
- त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अशा हल्ल्यांचे आदेश देण्याची हिंमत नाही.
तृणमूलचे असल्याने नाही तर कोरोना नियमभंगामुळे अटक!
- पोलिसांनी सांगितले की संध्याकाळी ७ वाजता कर्फ्यू चालू झाल्यानंतर प्रवास करून, कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल तृणमूलच्या १४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
- सिंह म्हणाले की, त्यांना आणि देबांगशु भट्टाचार्य, तानिया पोद्दार, सुदीप राहा आणि जया दत्ता यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली.
- ढाला जिल्ह्यातील अंबासा येथे शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला केल्याने राहा आणि दत्ता जखमी झाले होते.