मुक्तपीठ टीम
आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या जात आणि धर्मावरुन आरोप केले होते. मंगळवारी त्यांनी समीर वानखेडेंच्या पॉश राहणीमानावर आरोप केला आहे. समीर वानखेडे इतके प्रामाणिक अधिकारी आहे की, त्याच्या शर्टची किंमत ७० हजार रुपये आहे. ते दोन लाखांचे बूट आणि वीस लाखांचे घड्याळ वापरतात. त्यांचा बेल्ट आणि पँटही लाखोंच्या घरात आहे. त्यांनी एकदा घातलेला शर्ट पुन्हा ते कधीच घालत नाही. देशातील सर्व अधिकारी असेच प्रामाणिक झाले तर देशाचा चेहरामोहरा बदलेल, असेही ते म्हणाले. यावर आता समीर वानखेडें यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
दोन लाखांचे बूट, वीस लाखांचं घड्याळ, मलिकांचा आरोप
- समीर वानखेडे अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्याचं काही जण म्हणतात.
- मात्र गेल्या महिन्याभरात त्यांनी वापरलेल्यांची कपड्यांची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.
- वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत.
- दररोज ते नवीन कपड़े वापरतात.
- समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत.
- वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी – शर्ट, १ लाखाची पँट वापरतात.
- ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे.
- प्रामाणिक अधिकाऱ्याची ही जीवनशैली आहे.
- सर्व प्रामाणिक व्यक्तींनी अशाच प्रकारचं जीवन जगता यावं.
- राहणीमान आणि कपड्यांच्या बाबतीत वानखेडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील मागे टाकलं आहे.
वानखेडे यांना ८ कोटी देण्यात येणार होते
- नवाब मलिक म्हणाले की, आर्यन खान प्रकरणात सॅम डिसूझा समोर आला आहे.
- २५ कोटींचा सौदा झाल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे.
- जी १८ कोटींवर सेटल होणार होती.
- त्यापैकी आठ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते.
- फ्लेचर पटेल, किरण गोसावी, मनीष भानुशाली यांच्यावर आम्ही पहिल्या दिवसापासून प्रश्न उपस्थित केले होते.
- पण प्रत्येक वेळी सत्यमेव जयते बोलून पळून चालणार नाही.
- फसवणुकीचा हा खेळ थांबला पाहिजे.
- समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये रुजू झाल्यानंतर स्वत:ची वेगळी फौज तयार करून खंडणीचे रॅकेट सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
वानखेडेंवर आरोप
- नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडेंनी सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदुकोण यांना बनावट प्रकरणात बोलावले.
- आजपर्यंत या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही, असे का?
- या प्रकरणातून समीर वानखेडे यांनी हजारो कोटींची वसुली केल्याचे मलिक म्हणाले.
- ही वसुली दुबई आणि मालदीवमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.
- मी कधीच दुबईला गेलो नाही पण त्यांची बहिणी गेलेली.
मालदीवमध्ये जाणे सोपे नाही
- नवाब मलिक म्हणाले की, मालदीवला जाणे इतके सोपे नाही, तेही संपूर्ण कुटुंबासह.
- मालदीवमध्ये जाण्यासाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो.
- अशा स्थितीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर वानखेडेंना मालदीव ट्रिपवर पाठवले का?
- त्याचा खर्च नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केला होता का?
समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर
- समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे.
- नवाब मलिकांनी जास्त लांब नाही फक्त अंधेरीच्या लोखंडवाला मार्केटमध्ये जा, तेथे, त्यांना सर्व ब्रँड आणि त्यांचे दर सापडतील.
- माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे.
- मलिकांना याविषयी कमी माहिती आहे.
- मलिकांनी खरी माहिती शोधून काढावी.