Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

August 4, 2022
in घडलं-बिघडलं
0
मालदीवचे मा. अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट 2

मुक्तपीठ टीम

मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष एस एस मुंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मालदीवचे मा. अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट 1 (1)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले.   यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी – सेट भेट दिला.  औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेह भोजन आयोजित केले.

यावेळी मालदीवचे वित्त मंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल व परराष्ट्र सचिव अहमद लतीफ,  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाच्या संचालका राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व पोलीस महासंचालक रजनीश सेठ प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड मेंबर्स समवेत राष्ट्राध्यक्ष श्री सोलिह यांनी चहापान घेतल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थित नेटवर्क ऑपरेशन सेंटर (NOC)आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची  (SOC) पाहणी केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन हॉलमध्ये येऊन प्रातिनिधिक स्वरुपात घंटा वाजविली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्डच्यावतीने ‘द बिग बुल’ या कांस्य शिल्पाचे स्मृतिचिन्ह आणि ‘बी एस ई- टेंपल ऑफ वेल्थ क्रिएशन’ हे कॉफी टेबल बुक श्री.सोलीह यांना भेट देण्यात आले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे सिक्युरिटीज मार्केट आहे आणि 1875 मध्ये नेटीव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोशिएशन म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. आज जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक म्हणून त्याची गणना होते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष श्री. सोलिह आले होते, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष श्री. मुंद्रा यांनी दिली.


Tags: BSEIbrahim Mohammad SolehMaharashtramumbaiमालदीव राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थकवा, डॉक्टरांचा आरामाचा सल्ला, आजच्या सर्व बैठका रद्द!

Next Post

शिवसेनेसाठी पाऊण लाखाची नोकरी सोडणाऱ्या शिक्षक दिपक खरातांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार!

Next Post
Uddhav thackeray felicitated Teacher Deepak Kharat

शिवसेनेसाठी पाऊण लाखाची नोकरी सोडणाऱ्या शिक्षक दिपक खरातांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!