Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून झाले ‘हे’ महत्वाचे बदल!

समजून घ्या नेमके महत्त्वाच्या गोष्टींशी संबंधित कोणते मोठे बदल झाले...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
१ oct

मुक्तपीठ टीम

ऑक्‍टोबरच्या १ तारखेपासून काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल आपल्या स्वयंपाकघरापासून ते बँकेपर्यंत, बँक ग्राहकांपासून पेन्शनर्सपर्यंत परिणाम घडवणार आहेत. रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टींमधील हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे.

 

एलपीजी सिलेंडर पुन्हा महागणार

  • घरगुती एलपीजीचे दर १ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
  • त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये शंभर रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (अर्थात आजवरचा अनुभव लक्षात घेता निवडणुकीच्या हंगानात ही दरवाढ थांबते)
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (ब्रेंट क्रूड) पुन्हा एकदा 80 डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहे.
  • कच्च्या तेलाची किंमत गेल्या तीन वर्षातील किंमतींमध्ये सर्वाधिक आहे.
  • कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ होणार आहे हे नक्की.

 

खाद्यपदार्थांच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक आवश्यक

  • FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केला आहे.
  • सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाना घेणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • खाद्यपदार्थांच्या बिलावर FSSAI चा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे, असे निर्देशात नमुद करण्यात आले आहे.
  • छोट्या दुकानदारांपासुन रेस्टॉरंट पर्यंत सर्वांना कोणत्या खाद्यपदार्थांचा वापर केला जात आहे हे डिस्प्ले करावे लागेल.
  • आदेशाचे पालन न केल्यास दुकानदारा विरोधात कारवाई केली जाईल ज्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

 

पेंशनर्सच्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियमात बदल

  • डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम पुढील महिन्याच्या १ तारखेपासुन बदलत आहे.
  • देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी हा नवीन नियम आहे.
  • ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रांवर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतील.
  • यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बदल

  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नियम बदलले आहेत.
  • नवीन नियमांनुसार म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन लागू होईल.
  • १ ऑक्टोबर २०२१ पासून MSC कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या १०% रक्कम म्युच्युअल फंडच्या युनिटमध्ये गुंतवावी लागेल.
  • १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने ते पगाराच्या २० टक्के होईल.

 

ग्राहकांना माहिती दिल्याशिवाय बँका कोणत्याही खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत

  • १ऑक्टोबरपासून क्रेडिट-डेबिट कार्डच्या पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे.
  • १ ऑक्टोबरपासून क्रेडिट / डेबिट कार्डवरून ऑटो पेमेंटचा नवीन नियम लागू होणार आहे.
  • ज्याअंतर्गत ग्राहकांना माहिती दिल्याशिवाय बँका कोणत्याही खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत.
  • बँक यासाठी अगोदर माहिती देईल.
  • जर ग्राहकांनी यास परवानगी दिली तरच बँका त्या खात्यातुन पैसे काढु शकतात.

 

तीन बँकांचे जुने चेक बुक रद्द

  • युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBII), ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि अलाहाबाद बँकेचे जुने चेकबुक ऑक्टोबरपासून रद्द होणार आहेत.
  • या बँका इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.
  • त्यामुळे खातेधारकांचे खाते क्रमांक, चेक बुक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलण्यात आले आहेत.
  • १ ऑक्टोबरपासून जुने चेकबुक वापरता येणार नाहीत.
  • खातेदारांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल.

Tags: bankfssailpg cylinderMutual FundOctoberएलपीजी सिलेंडरऑक्‍टोबरडिजिटल लाईफ सर्टिफिकेटफूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाबँकम्युच्युअल फंड
Previous Post

मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप २०२१: ग्लोबल कंपनीत व्हर्च्युअल इंटर्नशिप करण्याची संधी

Next Post

कार्यक्रमांची गर्दी भोवली! मुंबईतील केईएम रुग्णालयातील २९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोना!

Next Post
kem hospital

कार्यक्रमांची गर्दी भोवली! मुंबईतील केईएम रुग्णालयातील २९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!