Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कार्यक्रमांची गर्दी भोवली! मुंबईतील केईएम रुग्णालयातील २९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोना!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kem hospital

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोनाचा कहर नियंत्रणात येत असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील २९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. धक्कादायक बाब अशी की त्यांच्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोना झालेल्यांपैकी दोन जणांना मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे ती गर्दीच त्यांना भोवल्याचं म्हटलं जातं.

 

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थी

केईएम रुग्णालयातील या कोरोना उद्रेकाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सांगितले की, हे विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आले आणि काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ते कोरोना पॉझिटिव्ह झाले.

 

  • २९ पैकी ७ विद्यार्थी प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत.
  • तर, उर्वरित २३ हे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.
  • मुंबईतील केईएम रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
  • कोरोना काळात ते कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले.
  • अशा परिस्थितीत, जर इतक्या लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने अधिक डॉक्टरांची तपासणी सुरू केली आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना आकड्यांमध्ये…

  • गुरुवारी राज्यात ३,०६३ नवीन रुग्णांचे निदान.
  • मुंबईत ४५१ नवे रुग्ण सापडले.
  • गुरुवारी ३,१९८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात गुरुवारपर्यंत एकूण ६३,७१,७२८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२७% एवढे झाले आहे.
  • राज्यात गुरुवारी ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • गुरुवारीपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८७,३९,९७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५०,८५६ (११.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २,४५,४२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात गुरुवारी रोजी एकूण ३६,४८४ सक्रिय रुग्ण आहेत.

Tags: coronaKEM HospitalMBBS Studentsmumbaiकेईएम रुग्णालयकोरोनामुंबईवैद्यकीय विद्यार्थ्यी
Previous Post

आजपासून झाले ‘हे’ महत्वाचे बदल!

Next Post

“गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार”: सचिन सावंत

Next Post
sachin sawant

"गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार": सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!