मुक्तपीठ टीम
महिंद्राने भारतात बहुप्रतिक्षित स्कॉर्पिओ – एन पूर्णपणे नवीन अवतारात लाँच केली आहे. महिंद्राने ३० जुलै रोजी या कारची बुकिंग विंडो सुरु केली होती. बुकिंग सुरू होताच या कारचे अवघ्या ३० मिनिटांत १ लाख बुकिंग झाले आहे. एवढेच नाही तर १ मिनिटांत या कारचे २५,००० हजार बुकिंग झाले होते. बुकिंग सुरू होताच सुरुवातीच्या अर्ध्या तासात तब्बल १८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या कार ग्राहकांनी बूक केल्या आहेत.
- महिंद्राने स्कॉर्पिओ – एन या कारची बुकिंग किंमत २५,००० रुपये आहे.
- महिंद्राची स्कॉर्पिओ-एन ही या कारची थर्ड जनरेशन आहे.
- महिंद्राने २० जून २००२ रोजी भारतात पहिल्यांदा स्कॉर्पिओ लाँच केली होती.
- या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत ११.९९ लाख रुपये इतकी आहे
- कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ५ ट्रिममध्ये लाँच केली आहे.
- Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L सह ३६ प्रकार आहेत.
- कंपनीने या कारचे पेट्रोल इंजिन १३ प्रकारांमध्ये आणि डिझेल इंजिन २३ प्रकारांमध्ये लाँच केले आहे.
- स्कॉर्पिओ-क्लासिक S3+ आणि S11 ट्रिममध्ये उपलब्ध आहे.