Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ब्राझिलमधून गायी! परदेशी बकऱ्याही! सरकारची आयातीसाठी केंद्राकडे मागणी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
cows and goats

मुक्तपीठ टीम

भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधिक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरित गीर गाय दिवसाला २५-२७ लीटर दूध देते. या गीर जातीच्या संकरित गायी भारतात आणून शेतकऱ्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायाची भरभराट होईल. यासोबतच सानेन या जातीच्या बकऱ्या, ज्या दिवसाला १०-१२ लीटर दूध देतात. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इस्राईल येथे मोठ्या प्रमाणात आहेत. या गायी आणि बकऱ्या शेतकऱ्यांना मिळाल्या तर दुग्धव्यवसायाद्वारे रोजगार वाढीसाठीही मदत होऊ शकेल. त्यामुळे या गायी आणि बकऱ्या आयात करून महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे केली.

 

जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बकऱ्यांना आयातीबाबत परवानगी मिळावी या पशुसंवर्धनसंदर्भातील महत्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत झाली. पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.

 

केदार यांनी केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांची कृषी भवन येथे भेट घेतली. बैठकीत राज्याशी निगडीत पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील जनावरांच्या विम्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी श्री.केदार यांनी यावेळी केली.
यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत प्रस्तावास मंजुरी तसेच या मिशनअंतर्गंत मिळणारा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल, असेही श्री.केदार यांनी सांगितले.


Tags: Brazil researchcentral GovernmentDairy businessExotic crossbred cowsexotic crossbred goatsgood newsMaharashtraMaharashtra Animal Husbandry Minister Sunil KedarmuktpeethNational Livestock Missionकेंद्र सरकारचांगल्या बातम्यादुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदारपरदेशी संकरित गायीपरदेशी संकरित बकऱ्याब्राझील संशोधनमहाराष्ट्रमहाराष्ट्र पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारमुक्तपीठराष्ट्रीय पशुधन मिशन
Previous Post

राज्यात १३ हजार ८४० नवे रुग्ण, २७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले!

Next Post

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्न, पायाभूत सुविधांसाठी निधी

Next Post
Ratnagiri Airport

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्न, पायाभूत सुविधांसाठी निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!