Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाच्या जीडीपीत महाराष्ट्र अव्वल…करोडपतीही सर्वाधिक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
GDP

मुक्तपीठ टीम

 

देशाची शान वाढवणारा महाराष्ट्र देशासाठी संपत्ती निर्मितीतही अव्वल आहे. महाराष्ट्र राज्यात थोडेथाडके नाहीत तर ५६,००० करोडपती कुटुंबं आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. देशातील ४ लाख१२ हजार कोटी कुटुंबांपैकी महाराष्ट्रासह या पाच राज्यांमध्ये देशातील ४६ टक्के करोडपती राहतात.

 

श्रीमंतांच्या वार्षिक यादीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरुण इंडियाच्या संपत्ती अहवालानुसार, देशात गेल्या वर्षी ४.१२ लाख करोडपती कुटुंबे होती. भारतीय अर्थव्यवस्था ही वर्षाकाठी तिसऱ्या क्रमांकाची अब्जाधीश आणि सर्वात वेगवान संपत्ती निर्माण करणारी अर्थव्यवस्था आहे. दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या कुटुंबाला डॉलरच्या हिशेबाने कोट्यधीश घर समजले जाते.

 

महाराष्ट्रात सर्वात जास्त महाश्रीमंत!

• महाराष्ट्राचा राष्ट्रीय जीडीपीत १६ टक्के वाटा आहे. महाराष्ट्राचाच जीडीपी सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ५६,००० डॉलर्स-कोट्यधीश घरे आहेत.
• कोट्यधीश कुटुंबांची संख्या उत्तर प्रदेशात ३६,००० आहे. गेल्या १० वर्षांपासून येथील अर्थव्यवस्था दरवर्षी १०.६ टक्क्यांनी वाढत आहे.
• तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमध्ये ३५,००० डॉलर-कोट्यधीश घरे आहेत. मागील पाच आर्थिक वर्षांत त्यांची अर्थव्यवस्था १२.२ टक्क्यांनी घसरली आहे.
• चौथ्या क्रमांकावर कर्नाटकमध्ये ३३,००० कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दहा कोटी डॉलर्स इतके आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात जवळपास १० टक्के वाढ होत असून दरडोई उत्पन्न गेल्या २० वर्षात ११ पट वाढले आहे.
• गुजरातमध्ये २९,००० डॉलर्स-कोट्यधीश कुटुंब असून या राज्याचे पाचवे स्थान आहे.
• दहा लाख कोटी कुटुंबांच्या पहिल्या दहा राज्यांमध्ये पश्चिम बंगाल (२४,०००), राजस्थान (२१,०००) आणि आंध्र प्रदेश (२०,०००) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि तेलगाना या दोन राज्यांमध्ये १८,००० कोट्यधीश कुटुंब आहेत.

 

महानगरांमध्ये कुठे किती महाश्रीमंत?

• शहरांचा विचार केला तर राष्ट्रीय जीडीपीच्या ६.२ टक्के उत्पन्न करणार्‍या मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत.
• दिल्लीत १५,८६१ कोट्यधीश कुटुंब आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये राष्ट्रीय राजधानीचे योगदान ४.९४ टक्के आहे.
• कोलकत्तामध्ये राज्यातील २४,००० कोट्यधीश कुटुंबांपैकी जवळजवळ ४२ टक्के आहेत.
• बंगळुरू ७,५८२ कोट्यधीश कुटुंबांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
• भारतीयांच्या कोट्यधीश कुटुंबांमध्ये चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईमध्ये ४,६८५ कोट्यधीश कुटुंबे आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: country GDPMaharashtraजीडीपीजीडीपीत महाराष्ट्र अव्वल
Previous Post

चिमुरडीवर बलात्कार…२६ दिवसात निकाल…नराधमाला फाशी!

Next Post

सारस्वत बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदावर संधी

Next Post
saraswat bank

सारस्वत बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदावर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!