मुक्तपीठ टीम
शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळ्याचे कनेक्शन उत्तरप्रदेशातही आढळले आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातून लखनऊमधून सौरभ त्रिपाठीला अटक केली आहे. तो जीए टेक्नॉलॉजीशी संबंधित होता आणि विनर ही कंपनी चालवत असे. याआधी पुणे सायबर पोलिसांनी बंगळुरुमधून अश्विन कुमारलाही जेरबंद केले आहे.
महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळा, उत्तरप्रदेशातही कनेक्शन!
- पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊमधून सौरभ त्रिपाठी अटक केली आहे.
- २०१८च्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
- पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणून चौकशी करणार आहेत.
- सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित होता.
- सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.
- बंगळुरूतून एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अटक
- जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.
- पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
- २०१७ मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.
- प्रीतिश देशमुखचा वरिष्ठ होता.
२०१८ मध्येही आतासारखाच घोटाळा
- २०१८ मध्ये टीईटी परीक्षा झाली होती त्यामध्ये गैरप्रकार झाला होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली होती.
- त्या परीक्षेतही आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता.
- १५ जुलै २०१८ ला परीक्षा झाली तर निकाल १२ ऑक्टोबरला लागला होता.
- त्यावेळचा परीक्षा नियंत्रक सुखदेव डेरेला नुकतीच अटक झाली आहे.
- प्राथमिक अंदाजानुसार ५०० लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळाली आहे.
- हा सर्व प्रकार किमान ५ कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.
टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला अटक करण्यात आली. त्यानंतर परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली.