Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

मुक्तपीठ टीम

नागपूर ते मुंबई या महानगरांदरम्यान भूपृष्ठ वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने ७०१ किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील मागास भागांच्या विकासाला एक नवा वेग येईल. या महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला. महामार्गाचे उर्वरित काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्पाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री.जगताप व संबंधित अधिकारी हे उपस्थित होते.

 

यावेळी विभागाच्या सादरीकरणात सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८,८६,९०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून अधिसुचित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकल्पास आवश्यक असलेला गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणीपत्र असलेल्या स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. बांधकाम पॅकेज १ ते १३ चे काम ३० महिन्याच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित आहे.

 

महामार्गास दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी वन विभागाची एकुण ५४६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केली असून वन्यजीवांच्या वावरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनीरोधकाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीमध्ये झाडे लावणे, सुशोभिकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे व संपूर्ण वृक्ष लागवडीची ५ वर्ष देखभाल आदी कामे करण्यात येणार आहेत. प्रकल्पामध्ये एकूण १६१ मेगा वॅट सौर उर्जा निर्मिती होणे अपेक्षित आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cm uddhav thackeraygood newsHindu Hriday samrat Balasaheb Thackeray Samruddhi Highwaymsrdcmuktpeethचांगली बातमीनागपूर ते मुंबई महामार्गमुक्तपीठमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य रस्ते विकास महामंडळहिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग
Previous Post

आला नंदीबैल…सांग सांग भोलानाथ…बारकोडवर डिजिटल दान मिळणार का?

Next Post

महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’!

Next Post
Girdawari

महाराष्ट्राच्या 'ई-पीक पाहणी' प्रकल्प आता राजस्थानात 'ई- गिरदावरी'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!