मुक्तपीठ टीम
जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात आता मोठी पोलीस भरती होणार आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. राज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या ५ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच ७ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
- ५२०० पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे.
- लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाल्या आहेत.
- आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे.
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७२०० पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे.
- आणि या संदर्भातील भरती प्रक्रियेची सुरुवात आता येत्या काही दिवसात सुरू करायची आहे
५२०० पदांची भरती अंतिम टप्प्यात
- राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत ५२०० पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे.
- विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे.
- त्यामुळं येत्या काही काळात ५२०० पदांवर तरुणांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.