मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांवर होणार आहे. यासाठी विभाग राज्य पोलिस दला अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात १२ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, यासाठी अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेवूया…
- महाराष्ट्र कॉन्स्टेबल भरती २०२२साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर पदांसाठी, ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक सहनशक्ति परीक्षण, चरित्र प्रमाणपत्र सत्यापन, मेडिकल टेस्ट इत्यादींच्या आधारे केली जाईल.
- या संबंधित अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार ऑनलाइन अर्जाच्या तारखा, अचूक पात्रता निकष, निवड निकष आणि इतर तपशील तपासण्यास सक्षम असतील.
या भरतीसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
या भरतीतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून किती शुल्क आकारले जाणार याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय महाराष्ट्र राज्य पोलीस या अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in वर police-recruitment तपासा. तसेच मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरूनही माहिती मिळवू शकता.