मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत.
- एन आय व्ही ने रिपोर्ट केले ४७ रुग्णांमध्ये ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
- मुंबई -३४
- नागपूर आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी ३
- नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी २
- पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी १
- आयसर संस्थेने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
- मुंबई -१९
- कल्याण डोंबिवली -५
- नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी ३
- वसई विरार आणि पुणे मनपा – प्रत्येकी २
- पुणे ग्रा. , भिवंडी निजामपूर , पनवेल, ठाणे मनपा – प्रत्येकी १
- आजपर्यंत राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | १३७* |
२ | पिंपरी चिंचवड | २५ |
३ | पुणे ग्रामीण | १८ |
४ | पुणे मनपा | ११ |
५ | ठाणे मनपा | ८ |
६ | नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, | प्रत्येकी ७ |
७ | नागपूर | ६ |
८ | सातारा, उस्मानाबाद | प्रत्येकी ५ |
९ | वसई विरार | ३ |
१० | औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा | प्रत्येकी २ |
११ | लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर | प्रत्येकी १ |
एकूण | २५२ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहे. ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ९९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२८१०७ | १६६२५४ | १९४३६१ | २८१०७ | ९७४० | ३७८४७ | २०४ | ८२ | २८६ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
हेही वाचा: