मुक्तपीठ टीम
कोरोना रोखण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय मानल्या गेलेल्या लसीकरणात महाराष्ट्राने नंबर १ क्रमांक कायम राखला आहे. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ डोस देण्यात आले. लसीकरणाची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात सातत्यानं आघाडीवर आहे. तसेच देशातील कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक लसीकरणाचा विक्रमही महाराष्ट्राने अबाधित राखला आहे.
लसीकरणाचा नवा विक्रम
- शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्यात ७ लाख ८५ हजार ३११ लसीचे डोस देण्यात आले.
एका दिवसातली ही आजवरची सर्वाधिक आकडेवारी आहे. - राज्यातील शनिवारचा लसीकरणाचा आकडा विक्रमी आहे.
- २६ जून रोजी एका दिवसात ७ लाख ३८ हजार ७०४ लसीकरणाची विक्रमी नोंद झाली होती.
- अवघ्या आठवडाभरात राज्याने तो आकडा पार केला आहे.
- महाराष्ट्राने आपलाच विक्रम मोडला आहे.
- संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.