मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्या कामकाजाची देशभर चर्चा झाली. त्यामुळे तामिळनाडू अल्पावधीच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याबरोबरच इतर राज्यांनाही पुरवठा करु शकला. तसेच अत्यावश्यक औषधे, इंजेक्शनांच्या काळाबाजार त्रस्त करत असतानाच तामिलनाडूत या सेवेने तामिळ रुग्णांना चिंतामुक्त ठेवले. त्यामुळेच आपल्या राज्यातही असा प्रयोग करण्याची कल्पना पुढे आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चेन्नईला भेट दिली आणि या सेवेबद्दल सर्व माहिती घेतली.
तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्यावतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांपैकी राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. श्री. टोपे यांनी चेन्नई येथे भेट देऊन तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्या कामाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.दारेज अहमद, उपायुक्त डॉ.मनिष आदी उपस्थित होते.
श्री.टोपे यांनी भेटीत तमिळनाडू वैद्यकीय पुरवठा साखळीची माहिती घेतली. तमिळनाडू वैद्यकीय साहित्य, औषधे पुरवठा करण्याबाबत राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती घेतली. तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशन राबवत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात फेरबदल करुन महाराष्ट्रात राबवण्यात येतील. जेणेकरुन राज्यातील वैद्यकीय साधनसामग्री आणि औषध पुरवठा अधिक जलद आणि सुसूत्र पद्धतीने होईल, असे श्री.टोपे यांनी सांगितले.
श्री.टोपे यांनी यावेळी तमिळनाडूत राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य व्यवस्थेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उत्तम उपाययोजनांचाही आढावा घेतला.
तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन आहे तरी कसे?
- तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लि. (TNMSC) ची स्थापना १९९४मध्ये झाली.
- वैद्यकीय औषधे, साधने यांची साठवण आणि वितरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये सर्व आवश्यक औषधे आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे महामंडळ स्थापन करण्यात आले.
- हे 1/7/1994 रोजी कंपनी कायदा, 1956 अंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते आणि जानेवारी 1995 पासून औषधे आणि औषधे खरेदी, साठवण आणि वितरणाचे कार्य सुरू केले आहे.
- TNMSC चे लक्ष्य गरीबांच्या गरीबांना औषधे आणि साहित्य उपलब्ध करून देणे आणि “जनतेची सेवा” करणे हे आहे.
TNMSC च्या संचालक मंडळात खालील संचालकांचा समावेश आहे:
- सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अध्यक्ष
- अतिरिक्त सचिव, वित्त विभागाचे संचालक
- व्यवस्थापकीय संचालक संचालक
- वैद्यकीय शिक्षण संचालक संचालक
- वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालक संचालक
- सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालक
- औषध नियंत्रण संचालक संचालक
- मिशन संचालक, एनएचएम संचालक
- मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी (इमारती) संचालक
पाहा व्हिडीओ:
रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र