मुक्तपीठ टीम
मुंबईच्या नरिमन पॉइंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीत राज्य सरकारची अनेक कार्यालयं काम सुरु करण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु असतानाच तिच्या मुख्यालयाच्या विक्री प्रक्रियेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राज्य सरकारने या मंत्रालयाजवळील या इमारतीच्या खरेदीसाठी बोलणी सुरु केली आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एअर इंडियाचे सीएमजी राजीव बंसल यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत इमारतीच्या मूल्यांकनावर चर्चा झाली.
एअर इंडियाचे मुख्यालय आकर्षणाचे केंद्र
- एअर इंडिया ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी आहे.
- विमान क्षेत्राचं खासगीकरण झालं नव्हतं या कंपनीचा सुवर्णकाळ होता.
- तेव्हा नरिमन पॉइंटवरील सरकारी मालकीच्या भूखंडावर एअर इंडियाने मुख्यालयाची इमारत बांधली.
- तेथून एअर इंडियाचे काम सुरु होते.
- कर्जात बुडालेल्या एअर इंडियाने २०१८ मध्ये २३ मजली इमारतीतील भाडेपट्टीचे हक्क विकण्याचा निर्णय घेतला.
- एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कुंटे यांना दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, या इमारतीची किंमत दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
- त्यानंतर कुंटे यांनी त्याला राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
जमीन राज्य सरकारच्या मालकीची
- इमारतीचे ठिकाण मंत्रालयाजवळ असल्यामुळे राज्य सरकार खरेदी करण्यास इच्छूक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
- एअर इंडियाची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे.
- एअर इंडियाने खर्च म्हणून राज्य सरकारला ४०० कोटी रुपये देणे आहे.
- एअर इंडियाला जर इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर त्यांनी मूल्यांकनाची प्रत द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले.
- सध्या एअर इंडियाने ही इमारत रिकामी केली असून फक्त वरचा मजला त्यांच्या ताब्यात आहे.
- उर्वरित इमारत त्यांनी भाड्याने दिली आहे.
- त्यातून त्यांना महसूल मिळतोय.