मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात आज कोरोना संसर्ग बेफाम म्हणावा तसाच वाढला. आजवरचे सर्वात जास्त रुग्णांचे आज निदान झाले. एका दिवसात राज्यात ३० हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण वाढले. त्याचवेळी ११ हजार ३१४ रुग्ण बरे झाले. राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा २ लाख १० हजारावर पोहचला. राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली, पण हे सर्व मृत्यू आजच्या दिवसातील नाहीत. त्यातील ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
आकड्यांमध्ये कोरोना
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे.
- आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,७९,६८२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ३७७९
२ ठाणे ३०३
३ ठाणे मनपा ६६६
४ नवी मुंबई मनपा ४६७
५ कल्याण डोंबवली मनपा ७६४
६ उल्हासनगर मनपा १२४
७ भिवंडी निजामपूर मनपा ४२
८ मीरा भाईंदर मनपा १७९
९ पालघर ६३
१० वसईविरार मनपा १४४
११ रायगड १४४
१२ पनवेल मनपा २९५
१३ नाशिक ९७४
१४ नाशिक मनपा १६६६
१५ मालेगाव मनपा ८२
१६ अहमदनगर ४९८
१७ अहमदनगर मनपा २५६
१८ धुळे १८६
१९ धुळे मनपा १८०
२० जळगाव ११२६
२१ जळगाव मनपा ३६८
२२ नंदूरबार ३२४
२३ पुणे १०९३
२४ पुणे मनपा २९७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३५०
२६ सोलापूर २२०
२७ सोलापूर मनपा १८४
२८ सातारा ३२६
२९ कोल्हापूर ३४
३० कोल्हापूर मनपा ३५
३१ सांगली ८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५९
३३ सिंधुदुर्ग १७
३४ रत्नागिरी २२
३५ औरंगाबाद ३१४
३६ औरंगाबाद मनपा १४००
३७ जालना ५२१
३८ हिंगोली १२६
३९ परभणी १३०
४० परभणी मनपा १२२
४१ लातूर १६७
४२ लातूर मनपा २००
४३ उस्मानाबाद १०६
४४ बीड ३३५
४५ नांदेड ४७४
४६ नांदेड मनपा ८७९
४७ अकोला २३२
४८ अकोला मनपा ३९९
४९ अमरावती १८५
५० अमरावती मनपा १४०
५१ यवतमाळ ३७०
५२ बुलढाणा ५६८
५३ वाशिम २९८
५४ नागपूर ९१८
५५ नागपूर मनपा २७४७
५६ वर्धा ३७६
५७ भंडारा १२१
५८ गोंदिया ९०
५९ चंद्रपूर १७९
६० चंद्रपूर मनपा ८३
६१ गडचिरोली २६
एकूण ३०५३५
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे-१८, नागपूर-४, अकोला-३, जळगाव-२, औरंगाबाद-१, रायगड-१, सातारा-१, ठाणे-१, आणि रत्नागिरी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)