मुक्तपीठ टीम
आज राज्यात २८,४३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या हजाराखाली गेली आहे. मुंबईसह महामुंबईत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचे दिसले. अशीच घट काही प्रमाणात मराठवाड्यातही झाली. मात्र, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील नव्या रुग्णसंख्येने आज पुन्हा दहा हजारावर उसळी घेतली. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोमवारपेक्षा मंगळवारी राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येत १,८२२ ने वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही ४ हजार ६८७ एवढी वाढ झाली आहे.
- आज राज्यात २८, ४३८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५२, ८९८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ४,१९,७२७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १०,५६६ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०५,८९९ (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ०५,३०८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ०३,५०२ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,५५९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,६०४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
महाराष्ट्र एकूण २८ हजार ४३८
कोरोना बाधित रुग्ण
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई मनपा ९६१
२ ठाणे १९९
३ ठाणे मनपा १७७
४ नवी मुंबई मनपा ११०
५ कल्याण डोंबवली मनपा १८०
६ उल्हासनगर मनपा १६
७ भिवंडी निजामपूर मनपा १४
८ मीरा भाईंदर मनपा १०४
९ पालघर १५१
१० वसईविरार मनपा २२६
११ रायगड २९७
१२ पनवेल मनपा १२४
ठाणे मंडळ एकूण २५५९
१३ नाशिक १२८४
१४ नाशिक मनपा ९६२
१५ मालेगाव मनपा १६
१६ अहमदनगर १९१७
१७ अहमदनगर मनपा १२८
१८ धुळे २०५
१९ धुळे मनपा १६९
२० जळगाव ४२७
२१ जळगाव मनपा ११५
२२ नंदूरबार ८५
नाशिक मंडळ एकूण ५३०८
२३ पुणे २०५३
२४ पुणे मनपा १०९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५६२
२६ सोलापूर २१०६
२७ सोलापूर मनपा ७९
२८ सातारा १२७०
पुणे मंडळ एकूण ७१६०
२९ कोल्हापूर १२५०
३० कोल्हापूर मनपा २५१
३१ सांगली १७४०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६५
३३ सिंधुदुर्ग २२३
३४ रत्नागिरी ३८१
कोल्हापूर मंडळ एकूण ४०१०
३५ औरंगाबाद ४४६
३६ औरंगाबाद मनपा ९१
३७ जालना १४७
३८ हिंगोली ८८
३९ परभणी २१०
४० परभणी मनपा ५२
औरंगाबाद मंडळ एकूण १०३४
४१ लातूर २९९
४२ लातूर मनपा ७२
४३ उस्मानाबाद ६५२
४४ बीड १२९५
४५ नांदेड १०६
४६ नांदेड मनपा ४४
लातूर मंडळ एकूण २४६८
४७ अकोला ४१६
४८ अकोला मनपा २३८
४९ अमरावती ८७३
५० अमरावती मनपा १६९
५१ यवतमाळ ७५०
५२ बुलढाणा ६५५
५३ वाशिम १९३
अकोला मंडळ एकूण ३२९४
५४ नागपूर ५४९
५५ नागपूर मनपा ६००
५६ वर्धा ५३६
५७ भंडारा १४७
५८ गोंदिया १८४
५९ चंद्रपूर २३०
६० चंद्रपूर मनपा १३०
६१ गडचिरोली २२९
नागपूर एकूण २६०५
इतर राज्ये /देश ०
एकूण २८ हजार ४३८
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ६७९ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ६१२ ने वाढली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.