मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन आता १५ दिवस झाले. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही ते दोघेच होते. मंत्र्यांच्या इतर खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. पण आता त्या लवकरच भरल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर लगेच १९ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींच्या संमतीनं मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
१९ जुलै रोजी होणार मंत्रिमंडळ विस्तार!!
- १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होणार आहे.
- त्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे.
- या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांची इच्छा आहे.
- विशेषत: शिवसेना सोडून शिंदे गटात आलेल्या आमदारांमध्ये काही तरी मिळावं ही भावना प्रबळ आहे.
- त्यातही पुन्हा आधीच्या सत्तेत मंत्री असणाऱ्या सर्वांना पदं द्यावीच लागणार आहेत.
- त्यामुळे वाट्याला आलेल्या मंत्रिमंडळातील जागांवर आपल्या समर्थकांची निवड करण्याचं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंपुढे आहे.
- मंत्रिमंडळ निवडीसाठी शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत.
- दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते.
- या बैठकांमध्ये मंत्र्यांची नावे नक्की झाली असून १९ जुलै रोजी शपथविधी पार पडणार असण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी?
- शिंदे मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे.
- भाजपाला २५ मंत्रिपदे, तर शिंदे गटाला १३ मंत्रिपदांची शक्यता आहे. शिंदे गटाला जास्त जागा मिळण्याचीही शक्यता आहे.
- त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केलं जाऊ शकतं.
- भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
- भाजपा गृहखातं, अर्थखातं, महसूल खातं ही खाती स्वत:कडेच ठेवणार आहे.
- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे भाजपाच्या अनेक अनुभवी नेत्यांचा विरस होणार आहे.