मुक्तपीठ टीम
हरियाणातील चार दहशतवाद्यांची महाराष्ट्र एटीएसकडूनही चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा महाराष्ट्रात घातपाताचा कट होता. त्यासाठी त्यांनी एका सोशल मीडिया अॅपचा वापर करत संवाद साधल्याचंही समोर आलं आहे.
या दहशतवाद्यांनी २०२१मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचविल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
- मुंबईत रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्लीपर सेलच्या माध्यमातून मुंबईत आरडीएक्स आणून वापरण्याचा कट आखला होता.
- पण हा कट अंमलात येण्याआधीच चार दहशतवाद्यांना अटक झाली.
- हे दहशतवादी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदाच्या संघटनेसाठी काम करत असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
- हरविंदर सिंह पकिस्तानमध्ये राहून भारतविरोधी कारवाया करत असतो.
- त्याच्या कटाची धक्कादायक माहिती चार दहशतवाद्यांच्या अटकेनंतर उलगडू लागली आहे.
- अटक केलेले चार दहशतवादी सोशल मीडिया अॅप वापरून एकमेकांच्या संपर्कात होते.
- दहशतवादी नांदेडमध्ये आणखी आरडीएक्स लवकरच नेणार होते.
- पण त्याआधीच दहशतवाद्यांना अटक झाली.
चार राज्याच्या तपास यंत्रणांकडून चौकशी…
- अटक केलेल्या दहशतवाद्यांची दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणातील अनेक पथके सतत चौकशी करत आहेत.
- त्यांना हरियाणा पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
- यापूर्वी शनिवारीही पंजाबच्या एटीएस पथकाने दहशतवाद्यांची चौकशी केली होती.
- दुसरीकडे, मुख्य दहशतवादी गुरप्रीतला कर्नालच्या सीआयए वन टीमने पंजाबमधील फिरोजपूर येथे नेले, जिथे दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे असाइनमेंट मिळायचे, त्यांनी ड्रोन, स्फोटके कोठे लपवून ठेवले याची ओळख पोलिसांनी पटवली.
- या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह दिल्लीच्या स्पेशल सेलचे पथक तपासात गुंतले आहे.