Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mahapreit

मुक्तपीठ टीम

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने ७ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जा व ऊर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला. या करारावर महाप्रितचे अध्यक्ष बिपिन श्रीमाळी व पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

 

स्वयंरोजगार निर्मितीच्या संदर्भात दुर्बल घटकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ऊर्जा वापराच्या खर्चात बचत करण्याची योजना या प्रकल्पामध्ये आहे. पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून सौर उर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्बन उत्सर्जन आणि डी-कार्बोनायझेशन कमी करणे, हे देखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाप्रित आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम हा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, ज्याचा पुणे शहरासह समाजातील दुर्बल घटकांनाही उपयोग होणार आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आणि महाप्रित यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ओळखल्या जाणाऱ्या पात्र उद्योजकांना स्थानिक उद्योजकता सुरु करण्यास समर्थन देण्याचीही या प्रकल्पाची कल्पना आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा खर्चात बचत करण्यासाठी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही असे प्रकल्प हाती घेण्यास त्यामुळे चालना मिळेल.

 

यावेळी महाप्रितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले की, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होईल. त्यामुळे भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चात बचत होईल. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रमकुमार यांनी या प्रकल्पाचा पुणे महानगरपालिकेला खूप फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करुन महाप्रित सोबत सामंजस्य करार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.श्री. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत)पुणे महानगरपालिका श्रीमती मनीषा शेकटकर, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, महाप्रित, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, जनसंपर्क अधिकारी सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि मिलिंद अवताडे हे उपस्थित होते.


Tags: Energy Saving ProjectMahapreit Chairman Bipin ShrimaliMahapritMahatma Phule Backward Classes Development CorporationMahatma Phule Renewable Energy and Infrastructure Limited LimitedMemorandum of UnderstandingPune Municipal Commissioner Vikram Kumarpune Municipal CorporationSelf-employmentऊर्जा बचत प्रकल्पचांगली बातमीपुणे महानगरपालिकापुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारमहात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीतमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळमहाप्रितमहाप्रित अध्यक्ष बिपिन श्रीमाळीमुक्तपीठसामंजस्य करारस्वयंरोजगार
Previous Post

एक तालुका असाही…जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा असाही एक वेगळा उपक्रम!

Next Post

ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत

Next Post
Vijay Vadettiwar

ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!