मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युला जूनमध्ये दोन वर्षे होतील. आजही या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. त्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण मुंबई पोलिसांनी नोंदवलं होतं. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भासवत असल्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होत आहे. सीबीआय तपासाविषयी अधिकृतरीत्या काही सांगण्यासही तयार नाही. त्याचवेळी सुशांतची बहिण प्रियंका आणि काही मुंबईतील चाहत्यांनी मात्र उत्तरप्रदेशातील काशीत सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी महाअभियान पुकारले आहे.
काशीच्या गंगा घाटावर महाअभियान!
सुशांत सिंह राजपूत के लिये काशी से शुरू हुआ महा अभियान अब दिल्ली के जंतर मंतर पर 👍
महादेव के भक्त SSR खुद स्वयं बॉलीवुड में तांडव करा रहें है आगे देखिए कितने बहरूपियों के असली चेहरे सामने आयेंगे 👍
#kashi#Dashashvamegh ghaat #Arti #Kashivishvanath @withoutthemind @divinemitz pic.twitter.com/jYiEZrNWP5
— Preeti Pandey🇮🇳 (@_PreetiPandey) April 14, 2022
- सुशांतची बहिण प्रियंका आणि महाराष्ट्रातील त्याचे काही चाहते काशीला गेले आहेत.
- त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या प्रिती पांडेही आहेत.
- सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांनी काशी विश्वनाथाची पूजा करून राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा मातेची आरती करत प्रार्थना केली.
- यावेळी सुशांतच्या चाहत्यांनी घाटावर सुशांतचे पोस्टर लावत त्यावर महाअभियान लिहिले.
लोकांची गर्दी पाहून आनंद झाला असेल…
- सुशांत सिंग राजपूतची मोठी बहीण प्रियंका हिने राजेंद्र प्रसाद घाटावर माध्यमांशी संवाद साधला.
- काशी विश्वनाथावर विश्वास असून जनतेला सर्व काही माहित आहे.
- न्याय मिळण्यास किती उशीर होतो हे ते पाहत आहेत.
- केंद्र सरकार आणि सीबीआयवर विश्वास आहे.
- लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
- जेणेकरून माझा भाऊ सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळू शकेल.
- सुशांतची महादेवावर नितांत श्रद्धा होती.
सीबीआय काय करत आहे?
- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून तपासात काहीही प्रगती झालेली नाही.
- सीबीआयकडून या प्रकरणाविषयी काहीही अधिकृत माहिती दिली जात नाही.
- पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी या प्रकरणी माहिती मागितली असता सीबीआयने नकार दिला.
- आरटीआयमध्ये माहिती दिल्यास तपासावर परिणाम होईल, असे कारण सांगण्यात आले.
वाचा:
सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास सीबीआयचा नकार! म्हणे तपासावर परिणाम होईल!
सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती देण्यास सीबीआयचा नकार!