मुक्तपीठ टीम
सिरम संस्थेचे आदर पूनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ट्विट केले. यात कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी अमेरिकेने उठवावी अशी विनंती आदर पूनावाला यांनी केली होती.
याचेच धन्यवाद मानण्यासाठी राष्ट्रवादी पदविधर संघ पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष्य माधव पाटील यांनी आदर पुनावाला यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विरुद्धच्या लढाईत आपली ‘सिरम संस्था’ आघाडीवर आहे. हेसुद्धा तितकेच खरे आहे की जगातील ६५% बालके अशी आहेत की ज्यांनी सिरम संस्थेची कोणती न कोणती लस घेतली आहे.
आपल्याबद्दलचा आदर अजूनच द्विगुणित झाला ज्या दिवशी तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ट्विट केले.
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
खरं तर हे केंद्र सरकारने करणे गरजेचे होते कारण संविधानाच्या आर्टिकल २४६ च्या संघ सूची क्रमांक १० नुसार ‘परराष्ट्र व्यवहार’ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. व्हेंटीलेटर्स/ऑक्सिजन निर्माण/ लस अशा गोष्टीत केंद्राने नियंत्रण न ठेवता राज्यांसाठीच काय तर कॉमन मॅन साठी खुल्या केल्या पाहिजेत. केंद्राचे नियंत्रण असतानासुद्धा तुम्ही कोणाचीही पर्वा न करता, कोणताही मुलाहिजा ने ठेवता थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती केली.
आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनासुद्धा आनंद झाला असता कारण संविधानाच्या न्याय, समता आणि स्वातंत्र्य यासाठीच, कॉमन मॅनच्या भल्यासाठीच तुम्ही हे पाऊल उचलले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे आर्टिकल यासाठीच टाकली असावीत.
सर ,
तुम्ही सर्व प्रोटोकॉल मोडून लोकांच्या आरोग्यासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गळ घातलीत.
या ट्विटने आपल्याबद्दल असलेला आदर द्विगुणित झाला.
लसीसाठी व ट्विट साठी धन्यवाद.
काळजी घ्या सर, लव यु.@PawarSpeaks @AjitPawarSpeaks@supriya_sule @SakalMediaNews#म #भारत #सिरम https://t.co/ymYLdifJTh pic.twitter.com/tSMDF0H9kj— Maadhav PatiLL (@MaadhavPatill) April 19, 2021
आजची कोरोनाची परिस्थीती पाहिली तर बेड/ ऑक्सिजन/ इंजेकशन्स मिळत नाहीत पण सिरमच्या या लसीमुळे एक आशेचा किरण जगातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत झाला आहे. मी व्यक्तिशः तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही.
लसीसाठी आणि त्या ट्विटसाठी माधव पाटील यांनी धन्यवाद मानले. माधव पाटील यांनी सदर पत्र हे समाज माध्यमांचा वापर करून आदर पूनावाला यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.